देशभरातील मतदारसंघांचा निवडणूक मतमोजणीचा निकाल एका क्लिक वर

741

मल्हार न्यूज (ऑनलाइन)

पुणे- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक-2019 च्या गुरूवार दि.23 मे 2019 रोजी होणाऱ्या देशभरातील मतदारसंघांचा निवडणूक मतमोजणीचा निकाल व फेरीनिहाय कौल थेट आपल्यापर्यंत आणला आहे. यासाठी आपणास भारत निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in या वेबपोर्टलवर संपर्क साधावा लागेल. हे पोर्टल मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वा. सक्रिय होईल. तसेच आयोगाने तयार केलेल्या  Voter Helpline हा ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घेवून सुध्दा आपण देशातल्या कोणत्याही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कौल आणि निकालाची माहिती घेवू शकता. या सुविधेचा आपण अवश्य लाभ घ्यावा तसेच अधिकाधिक मतदारांपर्यंत हा संदेश पोहोचवावा असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.