चेन्नई चॅलेंजर्सचा पुणे प्राईडवर 39-35 असा विजय

718

मल्हार न्यूज (ऑनलाईन) पुणे 

एलायाराजा व सुनील कुमार यांच्या जोरदार कामगिरीमुळे इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्सने पुणे प्राईडवर39-35 असा विजय मिळवला.

    मैसूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्स संघाने पहिल्या क्वॉर्टरमध्ये आक्रमक खेळ केला. चेन्नईच्या एलयाराजाने अष्टपैलू कामगिरी करत पहिले क्वॉर्टर 14-5 असे आपल्या नावे केले. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये पुणे प्राईड संघाने आक्रमक खेळ केला व क्वॉर्टर 8-8 असे बरोबरी राखण्यात यश मिळवले. पण, मध्यंतरापर्यंत 22-13 अशी आघाडी चेन्नई संघाने घेतली होती.

     तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये देखील चेन्नई चॅलेंजर्स संघाविरुद्ध चांगला खेळ करत चमक दाखवली.त्यांच्या खेळाडूंनी चढाई व बचावात चमक दाखवत क्वॉर्टरमध्ये 11-7 अशी छाप पाडत 33-20 अशी आघाडी घेतली. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये देखील चेन्नईच्या संघाने आपला हाच जोर कायम ठेवला.पुणे प्राईड संघाने आक्रमक खेळ करत क्वॉर्टरमध्ये 15-6 अशी गुणांची कमाई केली पण, संघाला विजय मिळवून त्यांना देता आला नाही.