कोथरुड मधील क्रांतीचौकात सांडपाण्यामुळे दुर्गंधी

1125

“नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर”

पौड रोड प्रतिनिधी, पुणे

कोथरुड येथील सुतारदरा परिसरात क्रांतीसेना चौकात गेले अनेक दिवस पासून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अश्या या वाहत असलेल्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालतांना नाक धरून चालावे लागत आहे. अशी तक्रार या भागातील महिला व जेष्ठ नागरिकांनी केली आहे.
रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने येथील व जा-ये करणाऱ्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबत संबंधीत प्रशासनाचे अधिकारी व प्रतिनिधींना कळवूनही या कडे दुर्लक्ष केले जात आहे.असे येथील नागरिकांनी सांगितले.
सध्या मुलांना शाळेत सुट्टी असल्या कारणाने लहान मोठी मुले बाहेर खेळत असतात. परंतु रस्त्यावर वाहत असलेल्या संपण्यामुळे मुलांना देखील आजार होऊ शकतो अशी भीती देखील नागरिकांनी वर्तवली आहे. प्रशासनाने याची दखल घेत योग्यते कार्यवाही करणे अपेक्षित आहे. असे मत बापू डाकले यांनी व्यक्त केले.रस्त्यावर येत असलेले सांडपाणी त्वरित बंद करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

स्थानिक नगरसेविका छाया मारणे म्हणलेकी, या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. चेंबरची दुरती करून हा प्रकार थांबवला जाणार आहे.