माहेरवरून पैसे आणण्यास सांगून शाररीक छळ करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

611

मल्हार न्यूज (ऑनलाईन)

३२ वर्ष विवाहित महिलेस माहेरवरून पैसे आणण्यास सांगून शाररीक व मानसिक छळ करणारे निशांत अशोक वंजारी रा. जाधववाडी मोशी पुणे, अशोक संभाजी वंजारी, संध्या अशोक वंजारी, गिरीश अशोक वंजारी रा.आदर्शनगर देहूरोड,पुणे तसेच अनंत अशोक वंजारी, प्रणाली अनंत वंजारी रा.अशोकनगर किवळे देहूरोड यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात भां.द.वि. ४९८)अ),३ २३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची चौकशी सुरू असून आरोपींना अजून अटक करण्यात आलेली नाही.

  याबाबत भोसरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला संबंधित कुटुंबातील व्यक्ती २३ एप्रिल २०१० पासून तिला माहेरवरून पैसे आणण्यासाठी द्वाब टाकत होते. संबंधित महिला नोकरी करत होती. ती करत असलेली नोकरी सोडावी म्हणून सतत तिला शिवीगाळ करून वांझोटी असे टोमणे मारत होते. २७ मे २०१९ रोजी पिडीत महिलेला हाताने मारहाण करून तिचा शाररीक व मानसिक छळ केला म्हणून तिने त्यांच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी त्वरित आरोपींच्या  विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.आरोपींची चौकशी सुरु असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.