अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आरोग्य शिबीर

568

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

अनुभूती शिबिरानिमित्तानेआयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर, रेवानगर(सरदार सरोवर डॅम,नर्मदा पुनर्वसन क्रं.3) ता:तळोदा जि:नंदुरबार येथे पार पडली.यामध्ये एकूण 106 लोकांचे मोफत मधुमेह, रक्तदाब व मुख स्वास्थ्य(कॅन्सर) तपासणी करण्यात आली,यावेळी कान-नाक-घसा तज्ञ,चिकित्सक मानसशास्त्रज्ञ,डेंटल हायजिनिस्ट यांनीही आरोग्य तपासणी केली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत डॉ. कल्पेश चव्हाण,जिल्हा सल्लागार यांना अभाविपचे पूर्व कार्यकर्ते व विद्यमान उपसरपंच दाज्या पावरा व संदीप पवार यांच्या हस्ते बिरसा मुंडा हे पुस्तक देऊन करण्यात आले,यावेळी अभाविपचे शहर संघटन मंत्री प्रमोद बेळंकी व कार्यकर्ते उपस्थित होते.