जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शपथ कार्यक्रम संपन्न

901

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार,सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार, युवारंग फाउंडेशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आज बिरसा मुंडा हॉल जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे तंबाखू विरोधी दिनानिमित्त शपथ घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी यांना शपथ दिली यावेळी उपस्थित यांना आव्हान करण्यात आले की अजूनही वेळ गेलेली नाही तंबाखू मुक्त होऊन आपण स्वतःचे व आपल्या परिवाराचे जीवन सुंदर बनवू शकतात,चला तर मग करुया संकल्प,घेऊया शपथ ठेवूया ध्यास तंबाखूमुक्तीचा यावेळी युवा रंग फाउंडेशनचे जितेन्द्र लुळे राहुल शिंदे सलाम मुंबई फाऊंडेशन प्रतिनिधी व नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी,दिलीप पावरा व जिल्ह्यातील प्रशासन सेवेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्व नागरिकांनी चांगले मतदान केल्याने रेकार्ड झाला जाणीव जागृती करण्यात प्रशासनानला यश आले त्याबद्दल जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे  यांचा सत्कार करण्यात आला.