सेवा निवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार

709

पुणे प्रतिनिधी

पोस्ट खात्यामध्ये ३५ वर्षे यशस्वी सेवा केल्यानंतर बंडू एकनाथ गुरव हे सेवा निवृत्त झाले. या निमित्त त्यांचा पुणे विभागाचे जनरल पोस्ट मास्तर रिझवी, पी.एस.रंगारी, मधुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बंडू गुरव हे १९८४ साली पोस्ट खात्यात रुजू झाले.त्यांनी मेल मोटार सेवा (जी.पी.ओ) येथे सेवा कार्यकाळ केला. सेवेत असताना त्यांनी एम.एफ.पी.ई. क्म्गार संघटनेत स्थानिक पातळीवर विभागीय सचिव राज्य पातळीवर उपसचिव म्हणून काम पाहिले.संघटनेच्या मार्फत त्यांनी कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.यानंतर त्यांनी पोस्ट आणि टेलेकॉम कामगार सोसायटी मध्ये संचालक म्हणून देखील काम पाहिले.त्यावेळेस कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करून कामगारांना स्थेर्य प्राप्त करून दिले. त्यांचा निरोप समारंभावेळी वातावरण भावूक झाले होते. यावेळी पोस्ट खात्यातील अधिकारी,कर्मचारी तसेच कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.