कृषि विभागाचे शहाद्यात धाड़सत्र ; 5 लाखांचे बोगस RRBT चे कापसाचे बियाणे जप्त

1181

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

सोमवार,3 जून  रोजी शहादा येथे तालुका कृषि अधिकारी श्री किशोर हड़पे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी अरुण तायडे,कृप निकुंभ,पो कॉ गद्रे यांनी संयुक्तपणे तालुक्यातील मौजे बामखेड़ा,वडाळी,कौठळ येथे एकूण 4 ठिकाणी कापसाचे बोगस RRBT बियाणे जप्त करण्यात आलेले आहे सदर मालाची अंदजीत रक्कम 5 लाख रुपए आहे सदर चा माल विक्रेते यांनी शेजारील गुजरात राज्यातून आणून विकत असल्याची माहिती होती सदर विक्रेते यांच्यावर पुढील फौजदारी कार्यवाही सुरु आहे.
या पुढे शेतकरी यांनी सदर बोगस बियाणे खरेदी करू नये असे आवाहन तालुका कृषि अधिकारी किशोर हड़पे यांनी केलेले आहे