बाल रंगभूमी रुजविणार बाल मनावर नाट्यकला

593

मल्लिनाथ गुरवे,

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सलग्न असलेली बाल रंगभूमी रुजविणार बाल मनावर नाट्यकला.आणि कार्यशाळेतून परिपूर्ण नाट्य शिक्षण देऊन घडविणार परीक्षांती उत्कृकृष्ट नाट्यकलाकार.

अखिल भारतीय नराठी नाट्य परिषदची घटक संस्था,”बाल रंगभूमी परिषद” ची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. बालवयापासूनच मुलामुलींना नाट्यकलेची रुची,निर्माण व्हावी, परिपूर्ण नाट्यशिक्षण मिळावे आणि नाट्यप्रेक्षक वाढावेत या हेतूने बालरंगभूमि परिषदची स्थापना करण्यात आली आहे.
एप्रिल व मे 2029 दरम्यानच्या काळात
7 ते 16 या वयोगटातील मुलामुलींसाठी अभिनव कार्यशाळा घेण्यात आल्या.याला मोठा प्रतिसाद मिळाला असून प्रत्येक जिल्यात हा उपक्रम राबविला जाणार आहे
अशी माहिती पुणे येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी परिषदेचे अध्यक्ष पारखी, दीपक रेगे,उदय लागू,नरेंद्र वीर,अंजली अत्रे,भैरवी पुरंदरे,रवी कोंडारे उपस्थित होते.

पूर्वी नाट्य कलेला मान,सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होती. नाट्यकलाकारांना अनन्यसाधारण महत्व होते.गावखेड्यात विविध सण, जत्रा म्हणजे नाट्यकलाकरांची मेजवानीच असायची.कामधंदा करता करता नाट्यकला जोपासली गेली.
ग्रामीण भागात नाटक उभे करण्यासाठी
दोन,तीन महिने सराव केले जात असे.आवड, जिद्द आणि चिकाटी, कलाकारांची अभिनय कला पाहून,नाट्य रसीकांचा जोश,उत्सुकता ओथंम्बुन वाहायचा.बदलत्या मनोरंजनाच्या साधनांमुळे प्रेक्षक दुरावत चालला आहे.

संगीत,चित्र,गायन,वादन,शब्दांचे भाव-विश्व इत्यादी महत्वपूर्ण कलांचा समावेश असलेल्या नाट्य कलेकडे दुर्लक्ष होत आहे.

संगीत व नृत्य कलेसाठी शासकीय परिक्षा घेतल्या जातात परंतु नाट्यकलेसाठी कोणतीही परीक्षा नाही.त्यामळे परिषदेने मुलांसाठी तीन परीक्षांचा अभ्यासक्रम तयार केला आहे.
7 ते16 वयोगटातील मुलामुलींना वर्षभरात प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी दोन तासाची कार्यशाळा घेऊन वर्षांती 100 मार्काची परिक्षा घेतली जाणार आहे.

रंगभूमी परिषद पुणे जिल्हा व प्राईड फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट( करिश्मा चौक कोथरूड, मॅक्डोनाल्ड शेजारी)
अभिनय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा वर्षभर सुरू करण्यात आली आहे.
संपर्क रवी – 8805560629
दीपक रेंगे-9423012002