स्पायसर हायस्कूलच्या अवाजवी फी वाढीच्या विरोधात पालकांचे ठ्ठिया आंदोलन

3645

मल्हार न्यूज, प्रतिनिधी
पुणे : स्पायसर हायस्कूल च्या वतीने दर वर्षी अवाजवी फी मध्ये वाढ केली जात आहे.
महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेने दोन वर्षातून एकदाच 15 टक्के फी वाढीचा मुद्दा असतांना स्पायसर हायस्कूल च्या वतीने सरळ 25 टक्क्यांनी फी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी ही फी वाढविली होती तरी देखील यंदा ही वाढविली. याच्या विरोधात स्पायसर हायस्कूल च्या प्रिंसिपल यांच्या कार्यालयाच्या समोर बसून पालकांनी ठ्ठिया आंदोलन केले.
यावेळी पालकांनी मागील वर्षा ची जी फी आहे ती तशीच या वर्षी लागू करुन त्या प्रमाणेच वसुल करावी ही मागणी अशी केली.
तसेच पुस्तक खरेदी करण्यासाठी स्पायसर हायस्कूल तर्फे फक्त एकच दुकान आहे. स्पायसर हायस्कूल ची सर्व 1ते 10 च्या वर्गाची पुस्तके एकाच ठिकाणी मिळत असल्याने मनमानी पद्धतीने पुस्तके व स्टेशनरीचे दर लावले जात आहे ते कमी करण्यात यावे, चांगले प्रशिक्षित टीचर उपलब्ध करावेत, मुलांची बस सेवा स्कुलच्या आवारातून व्हावी, स्पोर्टस् आणि अन्य अॅकटीव्हीटी ला प्राधान्य द्यावे आशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
जो पर्यंत ह्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत फी न भरण्याचा पवित्रा पालकांनी घेतला आहे.
यावर प्रिंसिपल शशिकांत गायकवाड यांनी पालकांना आशवासन दिले आहे की, येत्या शुक्रवार पर्यंत सर्व मागण्यावर सोलूशन काढण्यात येईल तो पर्यंत पालकांनी फी व पुस्तके खरेदी करू नये.
यावर पालकांनी आपले आंदोलन मागे घेतले .पण जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील सोमवारी भव्य स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असे PTA पालकांनी सांगितले.