शारदाई फॉउंडेशन राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित

918

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार- धडगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात स्वत:ची वेगळी छाप पाडणारी, निस्वार्थी, झुंजार आणि जनसामान्यांमध्ये रमणारी, अशी ओळख असलेली शारदाई फॉउंडेशन ही गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, व महिला सक्षमिकरण सारख्या आदी कार्यात
निःस्वार्थपणाने कार्यरत असुन समाजातील वंचित लोकांसाठी सेवा देण्यात कार्यरत असलेल्या फॉउन्डेशनला उत्कृष्ट कार्याबद्दल मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील नॅशनल अँटी हरॉसमेन्ट फॉउन्डेशन व एक सखा सोसिअल वेल्फेअर सोसायटी भोपाळ यांच्या विद्यमानाने राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार2019 भोपाल येथे कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आदिवासी अतिदुर्गम भागात सेवा व सामाजिक जनजागृती अशा अन्य बिंदुवर सामाजिक कार्य करणारी शारदाई फॉउन्डेशन उमराणी बु.यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फिल्म प्रोड्युसर मा.अहमद खान व मिस मल्टिनॅशनल इंडिया टॉप मॉडेल मा.शेफाली शर्मा,पोलीस प्रशासनचे मा.डी.सागर(डी वाय एस पी),नॅशनल अँटी हरॉसमेन्ट फॉउन्डेशनची अध्यक्ष मा.प्रतिभा वाईकर,एक सखा सोसिअल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष शुभम चौरासिया यांच्या हस्ते देण्यात आले आदिवासी दुर्गमभागात सेवा देत असलेल्या शारदाई फॉउन्डेशन उमराणी बु.च्या उत्कृष्ट कार्यबद्दल राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शारदाई फॉउंडेशन उमराणी बु.चे संस्थापक तथा आदिवासी विद्यार्थी एकता परिषदचे तालुकाध्यक्ष म्हणुन कार्यरत असलेले श्री.जगदिश एल. पावरा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातही गावोगावात
,खेडोपाडी स्वत:ची वेगळी छाप पाडणारी,निस्वार्थी, झुंजार आणि जनसामान्यांमध्ये रमणारी,अशी ओळख असलेली शारदाई फॉउंडेशन ही संस्था या शारदाई फॉउंडेशनचे अध्यक्ष म्हणुन कार्य पाहणारे आदरणीय जगदिश पावरा कायमच सामाजिक कार्यातसुद्धा अग्रेसर राहत,व सामाजिक बांधलीकीने जाणीवपूर्वक समाजाबद्दल संवेदनशील पणाने संस्थाच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी अग्रेसर असलेले त्यांच्या जीवनात अनेक अवघड प्रसंग, अपयशही त्यांच्या वाट्याला आले पण न डगमगता ते ठामपणे,निर्धाराने लढतच राहिले त्यांना सामाजसेवा करण्यात आणि समाजातील वंचित लोकांसाठी सेवा देण्यात आवड आहे यासाठी आपल्या समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी संघर्षयात्रा म्हणजेच संस्थाच्या माध्यमातून भारत रूरल लावलीहूड फॉउंडेशन दिल्लीच्या (BRLFभारत सरकार)तर्फे सर्टिफिकेट प्रोग्राम इन लावलीहूड(जयपूर)येथे जाऊन मध्यभारत मधील आदिवासी जनसंख्या असलेले अलग अलग राज्यात जाऊन विविध संस्था मधुन आदिवासी लोकांच्या विकासासाठी संपूर्ण ज्ञान प्राप्त करून अव्वल ग्रेड प्राप्त करून आपल्या राज्यात,तसेच आदिवासी भागात सेवा देण्यासाठी धावपळ आहे अलग अलग राज्यातील आदिवासी परिस्थिती व वातावरण याचा अभ्यास करून. आज शारदाई फॉउंडेशनच्या वाटचालीत अध्यक्ष म्हणुन अनमोल कार्य करत आहे. अगदी त्याचप्रमाणे आदिवासी विध्यार्थी एकता परिषद म्हणुन कार्यरत असताना मार्गदर्शक म्हणुन तरुणांना मार्गदर्शन मोटिवेटशन व सामाजिक समस्यांचे निराकरण करत असतात त्यांनी आपली ऊर्जा दाखवली आणि आज थोडे का असो पण तरुणवर्गामध्ये परिवर्तन घडवून आणले आज प्रत्येक वेळी ते एकच म्हणतात संस्था पुढे आल्यानंतर नक्कीच आपल्या तळागाळातील लोकांच्या अडचणी सुटतील असा ठाम विश्‍वास घेऊन ते कार्य करत असतात नेहमीच उपेक्षित आणि वंचितांसाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचले आहे व नेहमीच एक वाक्य म्हणतात सर्वांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व द्यायला पाहिजे आज आपल्या समोर प्रत्येक गोष्टीसाठी राजकारण्याचा दृष्टीने पाहण्याऱ्या लोकांच्या म्हणण्यावर लक्ष न देता आपल्या संस्थेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवुन निःस्वार्थपणे समाजातील वंचित गरीब लोकांनसाठी कार्य करायचे आहे संस्थाच्या माध्यमातून आज समाजातील अनेक गोर-
गरिबांना वेगवेगळ्या माध्यमातून आधार मिळत आहे, याचा दरवर्षी खुप लोकांना फायदा होत आहे,संस्थेने हाती घेतलेल्या या अनेक समाजिक कार्यातून खर्‍या अर्थाने उद्दिष्ट साकार तर होतच आहे,
तळागाळातील सामान्य जनतेच्या सुखासाठी झटणारा हा युवक आज फौंडेशनच्या मार्फत उमराणी बु!सारख्या गावाचा कायापालट करू पाहतोय त्यांच्या या अनमोल कार्यामुळे शारदाई फौंडेशनच नव्हें,तर गावाचे नाव सुद्धा जिल्ह्यात प्रचलित होत आहे