दारूने व्यसनाधीन झालेल्या भाच्याने घेतला आत्याचा जिव

851

आरोपींना तात्काळ अटक बोराखेडी पोलीसाची दबंग कारवाई; आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

मोताळा :- दारूच्या नशेमध्ये व्यसनाधीन झालेल्या भाच्याने व त्याच्या मित्राने दारू पिण्यासाठी 65 वर्षीय आत्याने पैशे न दिल्याच्या कारणावरून आत्याच्या डोक्यात कुऱ्हाड टाकून ठार केल्याची घटना 10 जुन सोमवार रात्री 11:30 दरम्यान मोताळा तालुक्यातील ग्राम तालखेड येथे घडली असुन घटनेची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन,ए एस आय मुस्तकीन शेख,ए एस आय गजानन वाघ,पो हे कॉ मिलिंद सोनुने,पो कॉ गोरे,पो कॉ थोरात यानी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून बोराखेडी पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली
या बाबत सविस्तर वृत्त असे की प्रभाकर निनू चोपडे वय 60 वर्ष रा तालखेड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली की माझी बहिण नलुबाई ही गेल्या 40 ते 45 वर्षांपासून तालखेड येथे राहते जन्मापासून उजव्या पायाने अपंग असलेली माझी बहिण ही माझा भाऊ बाळकृष्ण चोपडे यांच्या घरात राहत होती परंतु माझ्या भावाचा हृदय विकाराच्या झटक्याने मरण पावल्याने माझी बहिण ही माझा पुतण्या राहुल यांच्या मध्ये राहू लागली नलुबाई ला अपंगाचे व निराधार योजनेचे पैशे मिळत असल्याने माझा पुतण्या राहुल व माझी बहिण नलुबाई मध्ये पैश्याच्या कारणावरून वाद होऊन मारहाण होत होती त्याला अनेक वेळेस समजुन सांगितले असताना सुद्धा राहुल ऐकण्याच्या नव्हता व तो माझी बहिण नलुबाई हिला त्रास देत होता
काल दिनांक 10 जुन रोजी सर्वजन झोपलो असता रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान गल्लीमध्ये जोरजोरात आरडाओरडा आल्याने मी बाहेर येऊन पाहिले तर माझा पुतण्या राहुल व त्याचा मित्र पवन हरी चौधरी मला दिसले राहुलच्या खांद्यावर कुऱ्हाड पाहून मी त्याला विचारले असता माझ्या मध्ये कोण्ही आले तर त्याला कुऱ्हाडी ने तोडीन तेवढ्यात राहुलची पत्नी विजया राहुल चोपडे हिने बाहेर येऊन सांगितले की माझे पती राहुल यांनी आत्या नलुबाई हिला कुऱ्हाडी ने तोडले मी स्वता त्यांना बघितले नलुबाई ह्या घरासमोर पडलेल्या आहे मी जाऊन बघितले असता माझी बहिण नलुबाई ही घराच्या वट्या जवळ रक्ताच्या थोराळ्यात पडलेली दिसली मी ताबडतोब गावातील माझ्या चुलत भाऊ ना माझ्या बहिणीच्या घरी नेले असता मला व माझ्या चुलत भावाना माझा पुतण्या राहुल म्हणाला की मी आत्या नलुबाई ला कुऱ्हाडीने तोडले तुमच्या कफून काय होते ते करून घ्या त्यावेळी त्याच्या सोबत गावातीलच पवन हरी चौधरी हा सुद्धा होता आम्ही दोघांनी तिला कुऱ्हाडीने तोडले काय करायचे करा असे सांगून तिथून सरपंचांच्या घरा कडे निघून गेले तर गावातील प्रफुल्ल शरद चोपडे याला सुद्धा राहुल ने मी आत्या नलुबाई ला कुऱ्हाडीने तोडले असल्याचे सांगितले
दरम्यान 10 जून रोजी सुद्धा रात्री 11:30 ते 11:45 च्या दरम्यान माझी बहिण नलुबाई हिला मिळत असलेल्या अपंगत्व व निराधारच्या पैश्याच्या वादाच्या कारणावरुन राहुल ने कुऱ्हाडीने नलुबाई च्या कपाळावर वार करून गंभीर जखमी करून ठार मारले नलुबाई ला ठार मारण्यासाठी त्याचा मित्र पवन हरी चौधरी यांनी मदत केली असून प्रभाकर निनू चोपडे वय 60 यांच्या फिर्याफी वरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी राहुल बाळकृष्ण चोपडे,पवन हरी चौधरी विरुद्ध अप क्रमांक 189/19 च्या कलम 302,34 नुसार गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन,ए एस आय मुस्तकीन शेख,ए एस आय गजानन वाघ,पो हे कॉ मिलिंद सोनुने,पो कॉ गोरे,पो कॉ थोरात यांनी आपल्या तपासाची चक्रे तात्काळ फिरवत आरोपींना तात्काळ अटक करून दबंग कारवाई केली असून आज मंगळवार 11 जुन रोजी दोन्ही आरोपींना मोताळा न्यायालया समोर उभे केले असता त्यांना तीन दिवसाचा पी सी आर मिळाला असुन याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन,पो कॉ संजय गोरे हे करीत आहे