संशयित आरोपीकडे निघाल्या दोन गाड्या; कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई

882

कोंढवा प्रतिनिधी,

कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजस शेख , अमित साळुंखे सुरेंद्र कोलगे, पृथ्वीराज पांडूळे, पोलीस शिपाई जगदीश पाटील हे कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत असतांना संशयित आरोपी आनस  जमालुद्दीन सय्यद वय १९, राहणार मिठानगर हा एका अॅक्तीव्हा गाडीवर संशयित रीत्या फिरताना आढळला. त्यावरून त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता तो चोरीची दुचाकी फिरवत असल्याचे सांगितले यावरून कोंढवा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   याबाबत कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संशयित आरोपी आनस सय्यद हा एक चोरीची दुचाकी घेऊन फिरत होता. त्याला संशयावरून ताब्यात घेतले असता त्याने आणखी एक गाडी चोरली असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दोन्ही गाड्या जप्त केलेल्या असून सदरची कारवाई कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा.पो.निरी. चेतन मोरे व पो.उप.निरी.संतोष शिंदे, पोलीस हवा. राजस शेख , अमित साळुंखे सुरेंद्र कोलगे, पृथ्वीराज पांडूळे, पोलीस शिपाई जगदीश पाटील यांच्या पथकाने केली आहे.