केअर टेकर्स सोसायटीच्यावतीने २२४ विद्यार्थ्यांचे केक व गुलाबपुष्प देऊन स्वागत

700

सालाबादाप्रमाणे यंदाही  केअर टेकर्स सोसायटीने कँप एजुकेशन सोसायटीचे शाळेतील २२४  विद्यार्थीना केक व गुलाबपुष्प देऊन  स्वागत करण्यात आले.शाळेतील पहिला दिवस हा गोड व्हावा, मुलाना शाळेबदद्ल शिक्षणा बददल प्रेम, व आकर्षण वाढावे यासाठी केअर टेकर्स सोसायटीच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला .

 कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केअर टेकर्स सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे , हर्षराज बनसोडे, इरफान मुल्ला, विकास भांबुरे , अशोक देशमुख , सुनिल बाथम,ज्ञानेश्वर कांबळे यानी विशेष परिश्रम  घेतले .,स्वागत रांगोळी दुर्गेश काची यानी काढली.केक हिन्दूस्थान बेकरी तर्फ़े देण्यात आले, कार्यक्रमात शाळेच्या मुख्याधिपिका श्रीमती मुळगावकर मँड्म यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

कार्यक्रमाचे आयोजन  केअर टेकर्स सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे यांनी केले होते