आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत श्रीकांत रविंद्र सोमसे यांनी भारतासाठी सुवर्ण पदक पटकाविले

1060

मल्हार न्यूज (ऑनलाईन),

   नेपाळमध्ये काठमांडू येथील दशरथ स्टेडियम येथे झालेल्या बारावी नेपाळ शोतोकोन कराटे असोसिएशन आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत २०१९ दिनांक २९ मे ते १ जून २०१९ , आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत श्रीकांत रविंद्र सोमसे यांनी वजन गट ६६ ते ७० सिनियर पुरुष गटामध्ये भारतासाठी सुवर्ण पदक पटकाविले .

         गेले अनेक वर्षांपासून कराटे मार्शल आर्टचे सराव करत आहे . तसेच मॅचेस्टर यु. के. येथे झालेल्या जागतिक किक बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक व बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन रौप्य भारतासाठी पटकाविले आहे .

        त्यांना आर्यन मार्शल आर्टस् स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक सुनील कदम व राजेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले .