जिल्हाधिकाऱ्यांकडून शहादा तालुक्यातील विकासकामांचा आढावा

634

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी शहादा तालुक्यातील विविध गावांना भेट दिल्यानंतर तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत विकासकामांचा आढावा घेतला. त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर होते मंजुळे यांच्या संकल्पनेनुसार जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तालुकास्तरावर जाऊन विकासकामांचा आढावा घेत आहेत याची सुरूवात नवापूर तालुक्यापासून करण्यात आली होती सोमवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहादा तालुक्यातील शासकीय कार्यालये आणि विकासकामांना भेटी देऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी मंजुळे यांनी स्वत:वडछील शोभानगर आणि काथर्देदिगर या पुनर्वसीत वसाहतींची पाहणी केली आणि तेथील सुविधांचा आढावा घेतला त्यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयात बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला. नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशिलतेने काम करावे आणि क्षेत्रभेटीद्वारे नागरिकांच्या समस्या समजावून घ्याव्यात डॉक्टरांनी आरोग्य केंद्रात उपस्थित राहून नागरिकांना चांगली आरोग्यसेवा द्यावी,असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी शहादा नगर परिषद येथे भेट दिली. नगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि कामांचा त्यांनी आढावा घेतला यावेळी त्यांच्या हस्ते शहादा नगर परिषदेच्या दिव्यांगासाठी राखीव निधीतून सहा दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आलेbयावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील,तहसीलदार मनोज खैरनार,जि.प.सदस्य अभिजीत पाटील,मुख्याधिकारी डॉ.राहूल वाघ, उपनगराध्यक्ष रेखा चौधरी आदी उपस्थित होते मंजुळे यांच्या हस्ते दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बचत गटांना दहा हजार रुपयांच्या फिरत्या निधीचे वाटप करण्यात आले तसेच नागरिकांना कचराकुंडीचे वाटपदेखील करण्यात आले. त्यांच्या हस्ते फिरते शौचालय आणि व्ह्यॅक्युम क्लिनरचे लोकार्पण करण्यात आले. नागरिकांनी एकत्रितपणे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करावा नगरपालिकेला राज्यात स्वच्छतेच्या संदर्भात प्रथम क्रमांक मिळवून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले जिल्हाधिकारी मंजुळे यांच्या हस्ते श्रीमती लाडकरिबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे शाळा प्रवेशोत्सवाप्रसंगी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले जीवनात परिश्रम,जिद्द, चिकाटी आणि प्रमाणिकपणा असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळविता येते विद्यार्थ्यांनी एखादे ध्येय समोर ठेऊन वाटचाल केली तर त्यांना चांगले यश मिळविता येईल,असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.