पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंबा-थेंबाचे संकलन करावे; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

453

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

पावसाळा सुरु झाला आहे. आपण सर्वच भाग्यवान असून आपल्या देशाला निसर्गाने पुरेसे पावसाचे पाणी दिले आहे. निसर्गाच्या या देणगीचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंबा-थेंबाचे संकलन करुन ते जमिनीत मुरविणे ही काळाची गरज आहे,असे आवाहन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक सरपंच व ग्रामस्थांना पत्राद्वारे लिहून केले आहे गेल्यावर्षी देशात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला होता. महाराष्ट्र राज्य दुष्काळाला सामोरे जात आहे यावर्षी अद्यापही पाऊस सुरु झाला नसल्यामुळे सर्वजण चिंतेत पडले आहेबअनेक गावांत हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी तर पाण्याचे दुर्भिक्ष्यामुळे ग्रामस्थांना स्थलांतर करावे लागले आहे. भविष्यात अशी भयावह परिस्थिती निर्माण होवू नये, पिण्याच्या व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई निर्माण होवू नये यासाठी पावसाळ्यातच पडणाऱ्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे यामुळेच नरेंद्र मोदी यांनी देशातील सरपंचाना पत्र लिहून पाण्याचे नियोजन करण्याबाबत आवाहन केले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की,सरपंच व गावातील पदाधिकारी यांनी पुढाकार घेवून ग्रामस्थांच्या मदतीने यंदाच्या पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे जास्तीत जास्त संकलन करावे यासाठी शेतांची बांधबंदीस्थी,नदी व ओढ्यात चेक डॅम तयार करावेत,तटबंदी करावी,तलावांचे खोलीकरण व सफाई करावी वृक्षरोपण करावे, कृत्रीम तलावांची मोठ्या संख्येने निमिर्ती करावी यामुळे शेतात पडलेले पाणी शेतात व गावात पडलेले पाणी गावात संचयित करता येईल पाण्याचे संचयन झाल्याने अन्नधान्याचे उत्पन्न तर वाढेलच परंतू त्यासोबत गावात पाणी साठे तयार होऊन गावे जलसमृद्ध होतील.
आपला सरपंच आणि ग्रामस्थांवर पूर्ण विश्वास असून त्यांनी ग्रामसभेचे आयोजन करावे आणि ग्रामसभेत या पत्राचे वाचन करून पाणी संचयनाच्या या मुद्यांवर सर्वकष विचार विनिमय करावा स्वच्छ भारत अभियानात ग्रामस्थांनी सहभाग नोंदविल्यामुळेच या अभियानाला जसे जनआंदोलनाचे स्वरुप आले तसेच पाणी संकलनाच्या या अभियानात सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी सहभागी होवून जनआंदोलनाचे स्वरुप देत गावा-गावात पाडे,वाडी वस्त्यांवर पाणी संकलनासाठी जाणीव जागृती करावी अशक्य असणाऱ्या कामाला शक्य करुन नव्या भारताच्या निर्माणास सरपंचांनी योगदान द्यावे,असे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या शेवटी केले आहे.