जागतिक संगीत दिना’निमित्त सावनी रविंद्रची आली नवी म्युझिकल सीरिज

585

मल्हार न्यूज, ऑनलाइन

जागतिक संगीत दिन हा संगीताशी निगडीत प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात एखाद्या सणासारखा असतो. यंदाच्या संगीत दिनाचं औचित्य साधून सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रने सोशल मीडियावरून नवी म्युझिकल सीरिज लाँच केली आहे.

जागतिक संगीत दिनाविषयी सावनी रविंद्र सांगते, “संगीत हा ज्यांचा श्वास आहे. आणि संपूर्ण आयुष्य ज्यांनी संगीताला वाहिले आहे, त्या आमच्यासारख्या संगीत क्षेत्रातल्या सर्वांसाठी खरं तर रोजच संगीत दिन असतो.”

ती आपल्या सीरिजविषयी माहिती देते, “आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत संगीतच जगतो. पण जे संगीत क्षेत्रात नाही आहेत, त्यांच्याही आयुष्यात संगीताला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच त्यांचा संगीत दिन खास व्हावा ह्यासाठी मला असं वाटतं, गायिका म्हणून माझं हे कर्तव्य आहे, की मी त्यांना स्वरमयी भेट द्यावी. त्यामूळे जागतिक संगीत दिनानिमीत्ताने त्यांचा संपूर्ण आठवडाच संगीतमयी करावा, असं मला वाटलं. आणि मी ही नवी सीरिज सुरू केली. सध्या रोज एक व्हिडीयो मी सोशल मीडियावर अपलोड करते आहे.”

ह्या सीरिजमध्ये जुन्या नव्या मराठी-हिंदी गाण्यांचा संगम आहे. सावनी म्हणते, “अभंग, रोमँटिक, पावसावरचे गाणे, अशा वेगवेगळ्या मुड्सच्या गाण्यांचा समावेश ह्यात आहे. आजकाल लोकांना लाइव आणि रॉ ऐकायला आवडतं. त्यामूळेच ह्याचं वैशिष्ठ्य आहे, ह्या गाण्याच्या चित्रीकरणावेळी कुठेही ब्रेक किंवा रिटेक न घेता ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. ह्यासाठी ‘वन टेक जॅमिंग सेशन’ असा हॅशटॅगही मी वापरलाय. ही गाणी लोकांना आवडतायत. हे सोशल मीडियावरून सीरिजला मिळत असलेल्या रसिकांच्या रिस्पॉन्सवरून समजतंय. त्यामूळ खूप आनंद होतोय.