लोकशाहीच्या वटवृक्षावर माजलेल्या बांडगुळांच्या निर्दालनासाठी पार्टी आॕफ युनायटेड इंडियन्सची स्थापनाः अशोक बहादरे

887

मुंबई/प्रतिनिधी
जनसत्तेशी प्रतारणा करून राजसत्तेला मिठी मारणार्या राजकीय पक्षांच्या बोकाळलेल्या मनोवृतीला आव्हान देऊन नव्या भारताची लोकशाही सुदृढ करण्यासाठी पार्टी आॕफ युनायटेड इंडियन्स या राजकीय पक्षाची स्थापना झाली आहे.केवळ निवडणूका लढवून सरकार नावाची सत्ता प्राप्त करणे हा आमचा उद्देश नाही.तर बिघडलेला आणि जाणिवपुर्वक बिघडवलेला भारत नव्याने घडविण्यासाठी हा राजकीय नव्हे जनराष्ट्र पक्ष या देशात कार्यरत झाला असल्याची घोषणा पार्टी आॕफ युनायटेड इंडियन्स चे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बहादरे यांनी ……….येथे आयोजीत केलेल्या पञकार परिषदेत केली.
या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बहादरे यांच्या समवेत पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी संभाजी जाधव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष ओमकार सुब्रमनियम , उल्हासनगर शहराध्यक्ष श्यामभाऊ जांबोलीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आज स्वतंञ भारतात नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत शेकडो राजकीय पक्ष राजकारण आणि समाजकारण करीत आहेत.राजकीय पक्षांच्या या भाऊ गर्दीत पार्टी आॕफ युनायटेड इंडियन्स या आणखी एका नव्या राजकीय पक्षाची भर पडणार एव्हढाच या राजकीय पक्षाच्या आगमनाचा अर्थ घेऊ नये असे खास नमूद करून या पक्षाच्या स्थापनेमागचा उद्देश आणि वाटचाल राष्ट्रीय अध्यक्षांनी विषद केली.
ते म्हणाले,स्वातंञ्याच्या ७२ वर्षात भारताची मिळकत काय? प्रत्येक क्षेञात भ्रष्टाचार,बांडगुळांच्या इशार्यावारा नाचणारी अर्थव्यवस्था,बाजारू शिक्षण व्यवस्था,धर्मनिरपेक्षतेला उध्वस्त करून जात धर्माच्या भांडवलावर जनतेचे रक्त पिणार्या सत्तापिपासू गोचड्या,बेचिराख केलेली उद्योग व्यवस्था,उध्वस्त तरूणाई , बिभत्स पाश्चात्य संस्कृतीच्या गोठ्यात बांधलेली आमची गौरवशाली प्राचीन संस्कृती,राज्यघटनेची मोडतोड करून प्रतिराज्यघटनेचा अंमल हिच या बहात्तर वर्षात विविध सत्ताधारी आणि राजकीय पक्षांची स्वतंञ भारताला दिलेली देणगी आहे.
बहुपक्षिय संसदीय लोकशाही व्यवस्था आपण स्विकारली असली तरी या लोकशाहीला अनुसरून निर्माण झालेल्या राज्यघटनेप्रमाणे आपल्या देशाचा कारभार सुरू आहे का? या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर आहे.त्याचे स्पष्टीकरण देतांना अशोक बहादरे म्हणाले की,आपल्या राज्यघटनेत बहुमताने निवडून आलेले सरकार जेंव्हा अविश्वास किंवा विश्वास ठरावाला सामोरे जाते तेंव्हा केवळ एका मताने बरखास्त करण्याची तरतूद आहे का? मग हे कसे घडते.अशा प्रकारच्या अनेक घटना या देशात घडल्या आहेत, घडत आहेत.ही परिस्थिती बदलण्यासाठी जनराष्ट्र पक्ष म्हणून पार्टी आॕफ युनायटेड इंडियन्स हा राष्ट्रीय पक्ष अस्तित्वात आल्याचे बहादरे यांनी सांगीतले.