कोंढव्यात सीमाभिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू; दोषीवर कडक कारवाई करणार

977

अनिल चौधरी / मल्लिनाथ गुरवे,

कोंढवा बुद्रुक परिसारातील अल्कोन स्टायलस या बहुमजली इमारतीच्या सोसायटीच्या पार्किंगची संरक्षक भिंत मजुरांच्या झोपडपट्टीवर कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रावारी मध्यरात्री घडली आहे. यात पहाटेपर्यंत १५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.शुक्रवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे ही घटना घडली आहे. मध्यरात्री ही घटना रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.   कोंढवा येथील तालाब कंपनीसमोर अल्कोंन सोसायटी आहे. या सोसायटी शेजारीच आणखी एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथील मजुरांनी अल्कोंन सोसायटीच्या पार्किंग संरक्षक भिंतीला लागून या मजुरांनी झोपड्या बांधल्या होत्या. तेथे हे राहत होते. हे मजूर प. बंगाल आणि बिहारचे असल्याचे समजते.मध्यरात्री दोन च्या सुमारास पावासामुळे सीमाभिंत कोसळली. यावेळी हे सर्व मजूर गाढ झोपेत होते.भिंत कोसळल्यामुळे सर्व मातीचा ढिगारा हा मजुर राहत असलेल्या  पत्र्याच्या शेडवर कोसळला. यामुळे झोपेत असलेले सर्व  मजूर यामध्ये गाडले गेले. मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी त्वरित पोलिसाना व अग्निशामक दलाला दूरध्वनी करून याची माहिती दिली.अग्निशामक दलाने त्वरित बचावकार्य सुरु केले. यामध्ये ९पुरुष,२ महिला, ३ लहान मुले हे मृतदेह बाहेर काढले. कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दोन च्या सुमारास हि घटना घडली .वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी त्वरित घटना स्थळाकडे धाव घेऊन प्रशासानास सूचना देऊन मदत कार्य सुरु केले. मृत व्यक्तीची नावे खालील प्रमाणे 

१) अलोक शर्मा    वय २८ वर्ष

२ मोहन शर्मा    वय २४ वर्ष  

३) अमन शर्मा  वय १९ वर्ष

४) रवी शर्मा  वय १९ वर्ष

५) लक्ष्मीकांत सहानी  वय ३३ वर्ष 

६) सुनील सिंग     वय ३५ वर्ष 

७) भीमा दास       वय ३८ वर्ष 

८) दिपरंजन शर्मा   वय ३० वर्ष 

९) अवदेश शर्मा    वय ३२ वर्ष

१०) संगीता देवी   वय २६ वर्ष

११) जीवा देवी   वय ३० वर्ष

१२ ) सोनाली दास   वय ८ वर्ष

१३) ओवी दास  वय ६ वर्ष 

१४ ) अजित कुमार  वय ७ वर्ष 

१५) रावलकुमार शर्मा  वय ५ वर्ष  

तर पूजा देवी वय २८ वर्ष आणि अजय शर्मा वय १९ वर्ष हे जखमी आहेत. सदर सीमाभिंत हि अल्कोन स्टायलस या सोसायटीची आहे. कंचन डेव्हलपर्स पंकज व्होरा,नयन शहा आणि गांधी यांची भागीदारीत सुरु  असलेल्या  नवीन बांधकाम साईट साठी या या ठिकाणी बांधकाम सुरु होते. तर मजूरांसाठी भिंतीजवळ २० फुट खोल खाली पत्र्याच्या शेड उभारलेले होते जे अत्यंत धोकादायक होते.

बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी जेसीबीच्या आणि ब्रेकरच्या साह्याने खोदकाम सुरु होते.ब्रेकरच्या हादऱ्या मुळे अल्कोन स्टायलस या सोसायटीच्या भिंतीना तसेच इमारतीच्या खांबाना हादरे बसत होते.यामुळे येथे एखादी मोठी घटना घडू शकते याची तक्रार येथील रहिवाश्यांनी पालिकेकडे केली होती. परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथे कानाडोळा केल्यामुळे घटना घडली.

दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मदत कार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. कोंढवा येथील दूर्घटनेवरून प्रथमदर्शनी असे लक्षात येते की बांधकाम मजुरांसाठी जी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ती सुरक्षित नव्हती. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामविषयक सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

 

घटनास्थळाला पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम,पुणे पोलीस आयुक्त व्यंकटेश्वरन, अति.पोलीस आयुक्त सुनील फुलारी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख  पालिका आयुक्त सौरभ राव, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,महापौर मुक्ता टिळक, आमदार योगेश टिळेकर,मा.आमदार महादेव बाबर, नगरसेविका संगीताताई ठोसर, नगरसेवक वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर,नंदाताई लोणकर,मा.नगरसेवक भरत चौधरी, तानाजी लोणकर,संजय लोणकर, अमित जगताप, स्वप्नील कामठे ,प्रसाद बाबर, नारायण लोणकर,प्रशांत ठोसर विकास बधे,गंगाधर बधे तसेच स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून माहिती घेत होते.

 दरम्यान जलसंपदा मंत्री विजय शिवतारे ,जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना चार लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. तसेच मुख्यमंत्री साहयता निधीतून अधिक मदत मिळवून देण्याची घोषणा केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

https://www.facebook.com/stories/769231483202196/UzpfSVNDOjQ4MTEzMjA1NjAzMDUzMQ==/