Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेअग्रसेन ट्रस्ट चिंचवडच्या अध्यक्षपदी भीमसेन अग्रवाल यांची निवड

अग्रसेन ट्रस्ट चिंचवडच्या अध्यक्षपदी भीमसेन अग्रवाल यांची निवड

मल्हार न्यूज, ऑनलाईन पुणे
 चिंचवड-प्राधिकरण येथील अग्रवाल समाजाचे श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवडच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द बांधकाम व्यवसायी व ज्येष्ठ समाजसेवक भीमसेन अग्रवाल यांची निवड पुढील तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. 
नुकत्याच झालेल्या ट्रस्टच्या सभेमधे भीमसेन अग्रवाल यांची निवड अध्यक्ष पदी एकमताने करण्यात आली. तसेच यावेळी श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवडची कार्यकारणी ही घोषित करण्यात आली. यामध्ये प्रेमचंद मित्तल यांची कार्याध्यक्ष, रमेश गोयल- सचिव, सतपाल मित्तल- खजिनदार, विनोद मित्तल- सह खजिनदार, विनोद बंसल- अध्यक्ष भवन निर्माण, वेदप्रकाश गुप्ता- उत्सव समिति अध्यक्ष, मुकेश मित्तल- उत्सव समिति सह अध्यक्ष, रोहित गुप्ता- उत्सव समिति उपाध्यक्ष, सुनील अग्रवाल- जनसंपर्क अधिकारी, निरंजन अग्रवाल- धर्मशाळा अधिकारी, अनिल रामश्याम अग्रवाल- सांस्कृतिक समिति अध्यक्ष, अनील अग्रवाल-  सांस्कृतिक समिति  सह अध्यक्ष, पवन गोयल- हॉस्पिटल समिति अध्यक्ष, विजय अग्रवाल- हॉस्पिटल समिति सह अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. 
अध्यक्ष पदी निवड झाल्यावर भीमसेन अग्रवाल म्हणाले की, सर्वसमाज बांधव व दानशुर व्यक्तिंच्या सहकार्याने लवकरच समाजासाठी एक मोठी जागा घेऊन सर्वसुविधायुक्त, अत्याधुनिक व दोनशे कार पार्किंग असलेल्या एक भव्य मंगल कार्यालय, अग्रवाल समाजाचे कुलदैवत श्री अग्रसेन महाराज, गणपती व महालक्ष्मी मातेचे एक भव्य दिव्य मंदिर, आधुनिक गौशाळे बरोबरच एक शाळेचा ही निर्माण करण्यात येईल. सध्या ट्रस्टच्या वतीने गोरगरीब व्यक्तींसाठी चालविल्या जाणार्‍या चिंचवड भवनातील हॉस्पिटल चा ही विस्तार लवकरच करण्यात येईल
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!