जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

667

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे बैठक संपन्न झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात झालेल्या या बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे,विविध संबंधित यंत्रणांचे अधिकारी,प्रतिनिधी तसेच ग्राहक परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
बैठकीत ग्राहक संरक्षणाविषयी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढवा जिल्हाधिकारी श्री. मंजुळे यांनी घेतला.ग्राहकांच्या तक्रारीसंदर्भात सदस्यांनी मांडलेल्या मुद्यांवर संबंधित यंत्रणांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. ग्राहक संरक्षणाविषयी अडचणी असल्यास त्या सदस्यांनी सादर कराव्यात,त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल,असे श्री.मंजुळे यांनी सांगितले.
प्रारंभी ग्राहक परिषदेचे अशासकीय सदस्यांनी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांचे स्वागत केले जिल्हा पुरवठा अधिकारी भांगरे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेबाबत उपस्थितांना माहिती दिली.