मुख्यध्यापकास लाच घेताना रंगेहात पकडले

655

मल्हार न्यूज , प्रतिनिधी

सांगली येथील अभिनव बालक मंदिर शाळेचे मुख्यध्यापक महादेव कृष्णा कुंभार वय ५० यांना सेवापुस्तकावर स्टॅपिग करून देण्यासाठी  2000 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक सांगली विभागाने रंगेहात पकडले आहे.

याबाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार वय ४३ वर्ष, यांना वेतनपडताळणी करण्यासाठी लेखाधिकारी तपासणी पथक शिक्षण सांगली यांच्याकडून सेवा पुस्तकावर स्टॅपिग करून आणायचे होते. याबाबतचे काम मुख्याध्यापक महादेव कुंभार हे करत होते. सेवापुस्तकावर स्टॅपिग करून देण्यासाठी कुंभार यांनी तक्रारदाराकडे 2000 हजार रुपयांची लाच मागितली. लाच दिल्याशिवाय आपले काम होणार नाही याची खात्री झाल्यावर त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत तथ्य असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला, त्यात मुख्यध्यापक महादेव कुंभार यांना रंगेहात पकडण्यात आले. याबाबतचा पुढील तपास एसीबी सांगलीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

  कुठल्याही शासकीय, निमशासकीय, खाजगी इसमाने लाच मागितल्यास नागरिकांनी 1064 या टोल फ्री नंबर संपर्क करण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.