“कामाच्या लगीन घाईत पावसाळी लाईनच नाही”

666

“नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी”

पौडरोड,वार्ताहर

पौडरोड येथील जय भवानी नगर मधील मुख्यरस्त्याचे काम गेल्या काही महिन्या पूर्वी करण्यात आले आहे. करण्यात आलेल्या या कामामध्ये पावसाळी लाइन न टाकल्यामुळे तसेच पावसाचे पाण्याचा निचरा होत नसल्याने नव्याने करण्यात आलेल्या या रस्त्यामुळे मुख्यरस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याने येथील रस्त्याचे कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

जय भवानी नगर मधील हा मुख्य रस्ता
साधारणपणे 20 वर्षापुर्वी करण्यात आलेला होता कालांतराने रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा रस्ता उकरून नवीन ड्रेनेजपाइपलाइन, पिण्याची पाइपलाइन, व पावसाळी लाईल टाकून नव्याने रस्ता करण्यात यावा यासाठी या भागातील नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. त्याचप्रमाणे दै.पुढारीने या रस्त्याची दुरवस्थे बाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते त्यानुसार हा रस्ता तयार करण्यात आला.

महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विविध कामे हाती घेतली जातात यामध्ये रस्त्यांवरील खड्डे दुरूस्त करणे, पावसाळी लाईन टाकणे, नालेसफाई करणे, खोदालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करणे असे विविध कामे केली जातात. परंतु या नवीन रस्त्याच्या कामात पावसाळी लाईनच न टाकली नसल्याने पहिल्या पावसातच या रस्त्यावर पाण्याचे तळे साचले होते.

महापालिकाचे मुख्य खात्याकडून करोडो रुपये खर्च करून हे काम करण्यात आले असून नियमानुसार मुख्यरस्ताच्या कामामध्ये पावसाळी लाईन असणे गरजेचे असताना देखील या मुख्य रस्त्यामध्ये पावसाळी लाईन टाकली नसल्याने नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी कश्याला असे म्हणत
नागरिक नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिक समेश व्यास यांनी सांगितले की, ह्या रस्त्याचे डागडुजी अनेक वेळा करण्यात आले. त्यात आता सिमेंट कोक्रेट चा रस्ता करण्यात आला. पण हा मार्ग उताराचा असतांना देखील पावसाळी लाईन टाकण्यात आली नाही. तसेच काही दिवसातच चेंबर सुद्धा ढासळले आहेत. अश्या कामाची वरिष्ठांकडून तपासणी करून संबंधितत्यांवर कार्यवाही करावी अशी मांगणी व्यास यांनी केली.

:- त्यासंबंधीत कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधला असता, सहायक आयुक्त शिशिर बहुलीकर यांनी सांगीतले की, या रस्त्याचे काम मुख्य खात्याकडून करण्यात आले आहे. तरी या संदर्भात मी माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.
फोटोओळ:- पावसाळी लाईन न टाकल्याने पहिल्या पावसातच या रस्त्यावर पाण्याचे साचलेले तळे.