भटके-विमुक्त हक्क परिषदेच्या राज्यातील पहिल्या ग्राम समिती शाखा फलकाचे अनावरण

719

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

भटके-विमुक्त समाजाचे अनेक प्रश्न समस्या प्रलंबित असून समाजातील अशिक्षितपणा समाजातील असंघटित पणा समाजाला न मिळणारे योग्य मार्गदर्शन या सर्व गोष्टींमुळे हा समाज आपल्या अधिकार व हक्कापासून सातत्याने वंचित राहिला आहे या समाजात स्वतःच्या हक्काची अधिकाराची जाणीव करून समाजाला संघटित करून जाणीव- जागृतीच्या उद्देशाने भटके विमुक्त हक्क परिषद गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रातील 21 जिल्‍ह्यात सक्रियपणे कार्यरत आहे संघटन वाढीकरिता समाजातील प्रत्येक घटकाने समाजासाठी सातत्याने निरंतर काम करणे गरजेचे असून तरुणांनी या चळवळीत एक युवा शक्ती म्हणून काम केले पाहिजे संघटन वाढीकरिता गावात ग्राम स्तरावर ग्राम समित्या निर्माण होणे आवश्यक असून युवा आघाडी ने त्यात सक्रियपणे काम करावे असे प्रतिपादन प्रदेश कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी प्रकाशा येथील शाखा फलक अनावरण प्रसंगी व्यक्त केले भटके-विमुक्त हक्क परिषदेच्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शाखा फलकाचे अनावरण युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवी गोसावी यांच्या हस्ते शाखा फलकाचे विधीवत पूजन करून श्रीफळ वाढवून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र तीर्थक्षेत्री श्रीक्षेत्र प्रकाशा येथे त्रिवेणी संगमाच्या काठावर मान्यवर कार्यकर्त्यांच्या उपस्थित करण्यात आले भटके विमुक्त हक्क परिषदेचे ज्येष्ठ नेते प्रदेश संघटक भाऊसाहेब साहेबराव गोसावी ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक नानासाहेब सुपडू भाऊ खेडकर विभागीय संघटक मल्लू पवार धुळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी नंदुरबार जिल्हाध्यक्ष रामकृष्ण मोरे जिल्हाध्यक्ष रवी गोसावी युवा संघटन महेंद्र बोरदे यांनी मनोगत व्यक्त केले जिल्हा उपाध्यक्ष अशोक वैदू शहादा तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव तालुका उपाध्यक्ष गणेश सोनवणे शिरपूर तालुका अध्यक्ष प्रसाद गोसावी सोमा शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रकाशा शाखा क्रमांक एकच्या शाखा समितीच्या अध्यक्षपदी विजय झिंगा भोई उपाध्यक्ष दीपक शिंदे सचिव भगवान लोहार खजिनदार पंकज वानखेडे शाखा संघटक पंडित धनराळे यांची निवड जाहीर करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा सहसचिव तुकाराम लांबोळे सर यांनी केले तर भगवान लोहार यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र साठे विलास जावरे भावडू भाऊ ठाकरे सिताराम झिंगा भोई धनु झिंगा भोई यांनी विशेष परिश्रम घेतले