आषाढी एकादशी च्या पूर्व संध्येला रंगला “भजनरंग”

852

सागर बोदगिरे, पुणे:-

संतदर्शन मंडळ आणि सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत खास आषाढी एकादशी चे औचित्य साधून भजन , अभंग, भक्तीगीत ,कीर्तन यांचा समावेश असणाऱ्या “भजनरंग” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती येथे गायिका सावनी दातार व जेष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि प्रसिद्ध गायक राजेश दातार यांनी या कार्यक्रमात आपली कला सादर केली.
सादर कार्यक्रमात – देवाची ये द्वारी , रुनुझुनू रुनुझुनू, तू वेडा कुंभार , खेळ मांडीयेला ,निजरूप दाखवा हो , अवघे गरजे पंढरपूर , माझे माहेर पंढरी ,जोहार मायबाप , आता कोठे धावे मन , कानडा राजा पंढरीचा , पांडुरंग श्रीरंग ,बोलवा विठ्ठल ही गाणी सादर करण्यात आली.तसेच यावेळी चारूदत्त आफळे यांनी आपल्या कीर्तनाच्या जोडीने भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घडविले.लोकांना सादर गाण्यांना मिलिंद गुणे , रमाकांत परांजपे , राजेंद्र दुरकर , पद्माकर गुजर , राजेंद्र साळुंखे , नितीन जाधव आणि बासरी वादक अमर ओक यांनी समर्पक साथ केली . सर्वोत्कर्ष ट्रस्ट चे रावसाहेब सुर्यवंशी ,शरदचंद्र पाटणकर, शरद महाबळ ,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात रसिकांनी या अनोख्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात असंख्य रसिकप्रेक्षकांनी अनेक गाण्यांना भरभरून दाद देऊन गायक राजेश दातार यांच्या गाण्यांना व संपूर्ण कार्यक्रमास वन्स मोर ची दाद देऊन गौरवले . ध्वनी व्यवस्था आणि इतर निर्मिती व्यवस्था उत्तम असल्याने कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात मदत झाली .