15 जुलै रोजी महिला लोकशाही दिन

752

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांचे हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा या दृष्टीने शासन निर्णयानुसार महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी सोमवार 15 जुलै 2019 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथील रंगावली सभागृहात जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे . जिल्ह्यातील महिलांनी आपल्या समस्यांचे निरसन करण्यासाठी महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा,असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी कळविले आहे. महिला लोकशाही दिनात, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे,न्याय प्रविष्ठ प्रकरणे,सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबींच्या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत.अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय,रुम नं.226, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,टोकरतलाव रोड, नंदुरबार यांच्या कार्यालयात (दुरध्वनी क्र.02564-210047) साधावा.
0 0 0 0 0 0 0 0 0

 

गृह निर्माण संस्थांवर पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलमानुसार गृह निर्माण संस्थावर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी(प्रशासक) यांचे पॅनेल(नाम तालिका)तयार करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि शासकीय सहकार व लेखापदविका(जी डी सी ॲन्ड ए),उच्चतम सहकार पदविका (एचडीसी)धारक,चार्टंड अकौऊंटंट(सी ए)/इस्टिटुयट ऑफकॉस्ट ॲन्डवर्कस अकौऊंटंट(आय सी डब्लु ए)/ कंपनी सेक्रेटरी(सी एस), सहकार खात्यातील प्रशासन/ लेखापरीक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी,नागरी/ कर्मचारी सहकारी बँकामध्ये व्यवस्थापक यांचेकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत नामतालिकेसाठीचे अर्ज जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,नंदुरबार,खोली क्र.228, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,टोकरतलावरोड,नंदुरबार
कार्यालयात 3 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत मिळतील नामतालिकेचे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 3 सप्टेंबर 2019 पर्यंत आहे. अर्जाची छाननी 4 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत करण्यात येईल,प्रारुप
नामतालिका 9 ऑक्टोंबर ते
15 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत प्रसिध्द करण्यात येईल प्रारुप नामतालिकेवर 16 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत हरकती मागविण्यात येतील. प्राप्त हरकतींवर निर्णय घेण्याची अंतिम मुदत 5 नोव्हेंबर 2019 ही आहे व अंतिम लवाद तालिका 11 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिध्द करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक यांनी कळविले आहे.
0 0 0 0 0 0 0 0 0

 

 

अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो ही योजना राज्यामध्ये सन 2016-17 पासुन कार्यान्वित केली असुन या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के शासकीय अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर याचा पुरवठा सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यांत येतो.
बचत गटातील अध्यक्ष /सचिव व सदस्य यांचेराष्ट्रीयकृत बँकेशी बँक खाते क्रमांकआधारकार्डशी
संलग्न असावे. अनुदानाची रक्कम कमाल मर्यादा म्हणजे रुपये 3.15 लक्ष अनुज्ञेय राहील व ती रक्कम त्यांना बँक खात्यामध्ये पाठविली जाईल किमान मर्यादा पेक्षा आश्विक अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदीकरीता लागणारी जादांची रक्कम लाभार्थी बचत गटाने स्वत:खर्च करावी स्वयंसहाय्यता
बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, यांच्यामार्फत संबंधित जिल्हयातील इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांची यादी आयुक्त,समाज कल्याण आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे सादर करण्यांत येईल. स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर मागणीसाठी अर्ज सहायक आयुक्त समाजकल्याण
यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे योजनेचा लाभ नोंदणीकृत बचत गटांना देण्यात येईल अर्जासोबत जिल्हाग्रामीण
यंत्रणा जिल्हा परिषद,नंदुरबार
व पंचायत समिती येथे नोंदणी झालेले प्रमाणपत्र जोडावे. स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत जे स्वयंसहाय्यता बचत गट हे इच्छुक असतील त्यांनी नमुद केलेले कागदपत्र लेखी अर्जासह 30 जुलै 2019 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन टोकरतलाव रोड,नंदुरबार येथे संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,विभाग नंदुरबार यांनी कळविले आहे. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादेच्या 10 टक्के स्वहिस्सा स्वयंसहाय्यता बचत गट भरण्यास तयार आहे याबाबत रु.100 च्या स्टॅम्प पेपरवर लिहुन सादर करावे स्वयंसहाय्यता बचत गटाला मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने योजनेतंर्गत मिळाल्यानंतर त्या स्वयंसहाय्यता बचत गटाला यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संबंधित पुरवठाधारकावर राहिल. प्रशिक्षण मिळाल्याबाबत लेखीपत्र सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना सादरकरणे बंधनकारक राहील व त्याची एक प्रत प्रशिक्षण दिलेल्या संस्थेकडे परस्पर पाठविणार या आशयाचे लेखी पत्र,या योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटाला मिळालेले मिनी ट्रॅक्टर विकता येणार नाही अथवा सावकार किंवा अन्य व्यक्तीकडे गहाण ठेवता येणार नाही जर बचत गटाने मिनी ट्रॅक्टर विकल्यास गहाण ठेवल्यास सदर व्यवहार हा बेकायदेशीर ठरवुन स्वयंसहाय्यत बचत गटावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यांत येईल तसेच संबंधित स्वयंसहाय्यता बचत गटाकडुन शासनाने मिनी ट्रॅक्टरचा खरेदीसाठी खर्च केलेली संपुर्ण रक्कम वसुल करण्यांत येईल. तशा आशयाचे हमीपत्र रु.100 च्या स्टॅम्प पेपरवर सादर करण्यांत यावे,ज्या स्वयंसहाय्यता बचत गटाला या योजनेतंर्गत मिनी ट्रॅक्टरचे वाटप करण्यांत येईल अशा स्वयंसहाय्यता बचत गटाने किमान 10 वर्षापर्यत स्वत:हुन दरवर्षी 10 मे पुर्वी संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,यांना नोंदणीकृत डाकेने पत्र पाठवुन त्याला देण्यांत आलेला मिनी ट्रॅक्टर विकला नसल्याचे किंवा गहाण ठेवला नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे,ज्या लाभार्थ्यांना पॉवर ट्रिलरचा लाभ दिला गेलेला आहे. त्या लाभार्थ्याना या योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार नाही.