वाघेश्वर इंग्लीश स्कूलमध्ये पालखी सोहळा संपन्न

501

वाघोली : प्रतिनिधी  

आषाढ वारी आणि लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून वाघेश्वर इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये पालखीचे आणि लोकसंख्या नियंत्रण रॅलीचे आयोजन करण्यातआले होते.  

यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाखात आणि पारंपरिक पोषक परिधान करून  भाग घेतला होता. ज्ञानोबा, तुकोबांच्याप्रतिमेचे पालखीत पूजन करून पालखी जवळील विठ्ठल मंदिरात नेण्यात आली. फुगडीच्या खेळयाने कार्याक्रमची रंगत वाढवली होती. पालखीतून अध्यात्मिक संस्कारा बरोबरच विद्यार्थ्यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या घोषणा दिल्या. हा कार्यक्रम अतिशय भावपूर्ण व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. यामधून संदेश दिला. प्राचार्य राहुल राजगुरू आणि संस्थेच्या उपाध्यक्षा नीतू जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाचे शिक्षक यांनी केले. कार्यक्रमामध्ये शिक्षकवर्ग, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.