विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्षाचे उदघाटन

669

शैलेंद्र चौधरी नंदूरबार

विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात डिजिटल तंत्रज्ञाचे आकलन व्हावे, तसेच संगणकाचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी जनता माध्यमिक विद्यालय, घोटाणे ता.जि.नंदुरबार.येथे ‘संगणक कक्ष’चे उदघाटन करण्यात आले.

सेवा सहयोग,पुणे यांनी सिपीयू उपलब्ध करून दिले होते तर ‘युवकमित्र परिवार’तर्फे मॉनिटर उपलब्ध करून देण्यात आले लॅबचे उदघाटन सेवा सहयोग पुण्याचे माजी अधिकारी तथा डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार प्रशासकीय अधिकारी अनिल पाटील यांच्याहस्ते
करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध अहिराणी मराठी चित्रपट अभिनेते विजय पवार होते युवकमित्र परिवारचे संस्थापक प्रविण महाजन यांनी संगणक ज्ञानाचे महत्व पटवून संगणक साक्षरता अभियान व वाचन चळवळीचे कार्य विशद केले अभिनेते विजय पवार यांनी मिमिक्री सादर करूनविद्यार्थ्यांचे
मनोरंजन केले प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन सचिन धनगर यांनी केले तर आभार राहुल पाटील सर यांनी मानले.