कोठली जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप व संगणक कक्षचे उदघाटन

1144

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

कोठली.ता.शहादा येथील जिल्हा परिषद शाळेत युवकमित्र परिवार,पुणे यांच्यातर्फ शैक्षणीक साहित्य वाटप व संगणक कक्षाच्या उदघाटन चा कार्यक्रम नुकताच पार पडला. सदर कार्यक्रमाचे उदघाटन कोठली गावाच्या ज्येष्ठ नागरिक तथा निवृत्त अंगणवाडी शिक्षिका श्रीमती शकुंतलाबाई संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोठली गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. आसाराम दयाराम माळी हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अनिता मंडळे, डॉ.अशोक मंडळे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेंद्र लोटनसिंग गिरासे,
केंद्रप्रमुख प्रकाश माळी,पोलीस पाटील सुखदेव पाटील,विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्वस्त नारायणसिंग इंद्रसिंग गिरासे,माजी उपसरपंच ठाणसिंग गिरासे,प्रा.ज्ञानेश्वर गवळे,सामाजिक कार्यकर्ते सुरेश आनंदा माळी,भिका बाजीराव भिल,राजेंद्र गवळे,अमोल पाटील,राहुल पाटील,नितीन
साहेबराव पाटील व्यंकटराव
गवळे,भुरेसिंग भिल,गुमानसिंग भिल      पौलदसिंग,जामसिंह गिरासे,सुरेश शिरसाठ,रामदास गवळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते युवकमित्र परिवारचे प्रवीण महाजन यांनी शाळेला मोफत दोन संगणक संच भेट दिले तसेच स्कुल बॅग,वह्या,यासह शैक्षणीक साहित्यही भेट दिले
कार्यक्रम प्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक संजय भोई यांची बदली झाल्याने त्यांचाही निरोप समारंभ करण्यात आला तसेच नवनियुक्त शिक्षक यांचे स्वागत करण्यात आले प्रसंगी शाळेचे कृतिशील शिक्षक सुनीलमुरलीधर पाटील, मुख्याध्यापक
संजय भोई यांना ग्रामस्थतर्फ ‘सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळदेऊन
विशेष सन्मानित करण्यात आले प्रसंगी शिक्षकसुद्धा भारावून गेले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोकुळ माळी,भरत साळवे,भुपेंद्र बोरसे,नीरज पाटील यांचे सहकार्य लाभले तर शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी खोंडे यांनी आभार मानले.