शारदाई फौंडेशन आणि आदिवासी युवा एकता परिषद वतीने वृक्षारोपण

891

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत २०१९ च्या वृक्ष लागवड मोहिमेचा सुरुवात झाली असून, धडगाव तालुक्यातील शारदाई फॉउन्डेशनच्या मार्गदर्शनाखाली लटकूवा येथील आदिवासी युवा एकता परिषद व ग्रामपंचायत अचपा गावच्या संयुक्त विद्यमानाने 3 हजार 200 रोपांची लागवड करण्यासाठी वनक्षेत्रातील हद्दीत श्रमदानातुन खड्डे खोदण्यात आले व वृक्षारोपण करण्यास सुरवात करण्यात आले आहे यावेळी या उपक्रमांत शारदाई फॉउन्डेशनच्या वृक्षारोपण लागवड उपक्रमात सहभागी युवा ग्रामस्थाच्या सहकार्याने यंदा वर्षी विविध गावात जाऊन रोपांची लागवड करण्यात येणार आहे यावेळी शारदाई फॉउन्डेशनचे अध्यक्ष जगदिश एल.पावरा यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हटले रोपांची जोपासना करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थानी एकत्र येऊन आपले जंगल हिरवळता टिकवून ठेवली असुन ग्रामस्थांच्या वतीने चरागा बंदी व कुऱ्हाड बंदी करण्यात आली असुन आज जंगल वाचवून एक नवी प्रेरणा घेणारे गाव ठरलं असुन प्रत्येक गावासाठी हे एक प्रेरणादायी ठरले आहे वृक्ष लागवडीचे ग्रामस्थाना भविष्यात खुप फायदा होणार आहे लटकुवा गावातील युवा तरुणांनी आपल्या जंगलाचे संवर्धन खुप चांगले केले असुन याकडे प्रत्यक्ष कृतिशील पणाने कार्य करत आहे यासाठी शारदाई फॉउन्डेशन तर्फे येणाऱ्या दिवसात नैसर्गिक साधन संपत्ती व पाणलोट विकास क्षेत्र बाबत प्रशिक्षण देण्यात येणार असुन जल,जंगल,जमीनचे जोपासना करून गावातील प्रत्येकाला उपजिविका साठी गाव सोडून बाहेर गावी रोजगारासाठी जावे लागणार नाही व विस्थापन सारखी वेळ येणार नाही असे वक्तव्य केले वृक्षारोपण कार्यक्रमात मागील वर्षाप्रमाणे एक मुलं एक झाड ही संकल्पना पुर्ण करण्यात येणार असुन गुरुवारी जि.प.शाळा अचपा, लटकुवा,आमला येथील विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार असुन शारदाई फॉउन्डेशन उमराणी बु तर्फे शालेय साहित्य प्रोत्साहन म्हणुन वाटप करण्यात येणार आहे यावेळी ग्रामस्थांन कडून कार्यक्रमात सहभागी होण्याचे जाहीरपणे आमंत्रित करण्यात येत आहे तरी निसंकोचपणे आपले कर्तव्य म्हणुन एक पाऊल पुढे यावे यशस्वीतेसाठी युवा तरुण व ग्रामपंचायत अचपा व ग्रामस्थांनी नियोजन केले यावेळी उपस्थित मान्यवर अध्यक्ष जगदिश एल.पावरा, आदिवासी युवा एकता परिषद चे सामाजिक कार्यकर्ते राजू पावरा,के.के.पावरा,शैलेश पावरा,सत्तरसिंग पावरा, तुकाराम पावरा,मंगेश पावरा, सचिन जि.पावरा,भीमसिंग पावरा,किरण पावरा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक पावरा
,इंदास पावरा,रवींद्र पावरा,रामदास पावरा,प्रवीण पावरा, रोशन पावरा,सचिन पावरा,विक्रम पावरा,आकाश पावरा,
ब्रिजलाल पावरा, जयसिंग पावरा,बावला पावरा अजय पावरा यांनी परिश्रम घेतले.