कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती

687

भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय मानला जात आहे. 15-1 मतांच्या फरकाने भारताच्या बाजूने निकाल लागला आहे. कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत द्यावी, असे निर्देश देखील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत.

हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात नेदरलॅण्ड्समधील आंतरराष्ट्रीय कोर्टात आज निर्णय देण्यात आला. या निर्णयानंतर देशभरात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, कुलभूषणना कायदेशीर मदत देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. कुलभूषण यांच्यावर पुन्हा खटला चालणार आहे.