शैलेंद्र चौधरी, नंदुरबार
नंदूरबार जिल्ह्यातील 22 उपसा सिंचन योजनेबाबत जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजन यांना शेतकरी शिष्ट मंडळाने जळगाव येथे दि.19.07.2019 रोजी विजयभाऊ चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले.याप्रसंगी उपस्थित शेतकरी यशवंत लिंमजी पाटील,
महेंद्रभाई पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी गिरीष महाजन यांनी मी स्वतः वयक्तिक लक्ष देऊन योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.