रयत क्रांती संघटनेच्या बुलढाणा युवती जिल्हाध्यक्ष पदी निशा महाले

689

अमीन शाह,बुलडाणा

चिखली: कृषी उत्पन्न बाजार समिती येथिल शेतकरी भवन येथे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी आयोजित केले होते.
याप्रसंगी कृषी, पणन, पाणीपुरवठा ,फलोत्पादन व स्वच्छता राज्य मंत्री ना. सदाभाऊ खोत,प्रदेशाध्यक्ष शिवनाथ भाऊ जाधव ,प्रदेश कार्याध्यक्ष दीपकभाऊ भोसले व विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांच्या मार्गदर्शनात व युवती प्रदेशाध्यक्ष प्रिया लोडम पाटील व महिला जिल्हाध्यक्ष वंदना वाघ यांच्या नेतृत्वात मलकापूर येथील निशा महाले पाटील यांची रयत क्रांती संघटनेच्या बुलढाणा जिल्हा युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली, याप्रसंगी विनायक सरनाईक,संतोष राजपूत , तुषार काचकुरे, संदीप मुळे,उमेश इंगळे,सोनू चव्हाण, अनिल चव्हाण,निवृत्ती जाधव,विलास तायडे,अर्चनाताई शिंगणे, कांचन ताई मुठाळ,नितीन लोखंडे,मनोज काटेकर,नेवरे,उमेश कुटे,अविनाश भाकडे आदींची उपस्थिती होती.