पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक

1341

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन,राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा आणि सांविधानिक जिल्हा नियोजन समितीवरील सन्माननीय सदस्य,विशेष निमंत्रित सदस्य यांचे उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीचे बैठक दि 25 जुलै 2019 रोजी सकाळी 10 वाजता क्रांतीवीर बिरसा मुंडा सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकीस सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती नंदुरबार यांनी केले आहे.
—-
मयत व्यक्तिबाबत माहिती देण्याचे आवाहन

नवापूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूचे प्रकरण दाखल करण्यात आले असून त्यात नमूद असल्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जवळील अवधुत सॉमिलच्या समोर साधारण 200 मीटर अंतररावरील टेकडीवर पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे पुरुषाचे वय अंदाजे 45 वर्ष असून त्याबाबत इतर कोणतीही माहिती नाही अंगात निळ्या रंगाचा पांढऱ्या लायनिंगचा हाफ बाह्यांचा शर्ट,पांढऱ्या रंगाचा बनियान,काळ्या रंगाची फुलपँट घातलेली आहे मृत व्यक्तिबाबत माहिती असल्यास पोलीस निरीक्षक डी.एस.शिंपी (02569,250333/9823227950) यांचेशी संपर्क साधावा.
—-
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक,विधवा,युद्धविधवा यांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय धुळे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2019-20मध्ये दहावी,बारावी, पदविका अथवा पदवी परिक्षेत 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला असल्यास शिष्यवृत्ती देय आहे.
शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत स्विकारले जातील सीईटी,जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या पाल्यांच्या प्रकरणासोबत गॅप सर्टीफीकेट(स्वयंघोषणापत्र) सादर करावे शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिक,विधवा,युद्धविधवा यांच्या पाल्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
——
लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त अभिवादन

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी (ससप्र) दत्तात्रय बोरुडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे,निवासी
उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी धनंजयनिकम
(प्रशासन),सुधीर खांदे (निवडणूक),तहसिलदार उल्हास देवरे,गायत्री सैंदाणे आदी उपस्थित होते अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
—–
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अर्जासाठी आज शेवटचा दिवस

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांसाठी पिक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 24 जुलै 2019 असून जिल्ह्यातील खरीप हंगामातील भात,खरीप ज्वारी,बाजरी मका, तूर,मुग,उडीद,सोयाबनी भुईमुग, सुर्यफुल 2 टक्के विमा हप्ता दर व कापूस पिकासाठी 5 टक्के विमा हप्ता दर ठरविण्यात आला आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून पिक पेरणीपासून
काढणीपर्यंतच्या कालावधीत अतिवृष्टी,अवकाळी पाऊस व दुष्काळ,पावसातील खंड,किड व रोग इत्यादि बाबींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट हवामान घटकाच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाच्या पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान,पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान याबाबीसाठी पीकविका योजनेपासून संरक्षण मिळणार आहे या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांना जवळच्या प्राधिकृत बॅंक/ प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था संबंधित विका कंपनीचे कार्यालये किंवा विमा प्रतिनिधी संपर्क साधून विमा प्रस्थाव विहित प्रपत्रात योग्य त्या विमा हप्त्यासह तसेच आवश्यक त्या कागदपत्रासह विहित वेळेत आपले सरकार सेवा केंद्रावरुन सादर करावा शेतकऱ्यांनी पिक विमा प्रसताव सादर करतांना धारण केलेल्या जमिनीचा पुरवा म्हणून सातबारा उतारा तसेच शेतात अधिसूचित पिकाची पेरणी केले असेल बाबतचे स्वंयघोषणापत्र,आधारकार्ड, बँक खात्याचा तपशिल इ.विमा प्रस्तावासोबत देणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना अर्ज भरण्याची सुलभता यावी यासाठी मागील खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पिक विका योजनेचे शेतकऱ्यांचे अर्ज/विमा हप्ता कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येत आहेत.
यासाठी असे केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
शेतकऱ्यांनी पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी,कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक तसेच
उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी शहादा वि.भा.जोशी यांनी केले आहे भात(तांदुळ) विमा संरक्षित रक्कम 30 हजार विमा हप्ता रक्कम 600,ज्वारी 24 हजार 500 विमा हप्ता 490, बाजरी 20 हजार विमा हप्ता 400,मका 27 हजार 500 विमा हप्ता 550,भूईमुग 32 हजार विमा हप्ता 640,सोयाबीन 37 हजार 500 विमा हप्ता 750,मुग व उडीद 19 हजार विमा हप्ता 380,तूर 30 हजार विमा हप्ता 600 व कापूस पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 37 हजार 500 असून विमा हप्ता 1 हजार 875 रुपये असे दर आहेत.
0 0 0 0 0 0 0 0 0
दि 26 जुलै रोजी बालहक्क जनसुनावणीचे आयोजन

जिल्ह्यातील पिडीत बालकांना/पालकांना किंवा बाल अधिकारासाठी काम करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीस स्थानिक पातळीवर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार करता यावी यासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडून शुक्रवार दि 26 जुलै 2019 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या जनसुनावणीत घातक व्यवसायामध्ये सहभागी बालकामगार मुले,घरगुती बालकामगार,पगार/मोबदला देय असतांना पगार न दिलेली मुले,सुटका करून त्यांच्या मुळ ठिकाणी पाठविलेले
बालकामगार,रस्त्यावर उत्पादन विक्री करणारे मुले,ॲसिड हल्ला संबंधित केसेस,आईवडीलांसह/
पालकांसह किंवा इतर दुसऱ्या व्यक्तींसह रस्त्यावर भिक मागणारी मुले,जबरदस्ती भिक मागायला लावलेली मुले, शारीरीक शोषण/हल्ला/सोडून दिलेली/दुर्लक्षीत मुले,घरगुती हिंसाचाराचे बळी पडलेली मुले, HIV बाधित असल्याचा कारणाने भेदभाव करण्यात आलेली मुले,पोलीसांकडून मारहाण करण्यात आलेली मुले, बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थेंकडून छळ झालेली/ अयोग्य वागणुक दिलेली मुले, बेकायदेशीर दत्तक घेतलेली मुले,बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थेकडून विक्री करण्यात आलेली मुले,हिंसाचार झालेली मुले,मुलांची विक्री करणे,निष्काळजीमुळे मृत्यू पावलेली मुले,अपहरण झालेली मुले,हरवलेली मुले,आत्महत्या , इलेक्ट्रॉनिक्स/सोशल/प्रिंट मिडीयात मुलांचे हक्कांचे उल्लघंन झालेली मुले, जवळपास शाळेची सुविधा नसल्याने व सोयी सुविधा अभावी शाळेत गैरहजर राहिलेली मुले,शुल्क फी संबंधीत,शाळेत शारीरीक शिक्षा/शारीरीक शोषण झालेली मुले,शाळेत प्रवेश नाकारलेली मुले,तक्रारी करण्यात असमर्थ असणारी मुले,भेदभाव,राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण व राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षणाची पुस्तके मिळण्यापासून वंचीत असलेली मुले,शैक्षणिक प्राधिकरणाद्वारे
मुल्यांकनासाठी/सुधारणेसाठीची प्रक्रिया न झालेली मुले,शाळेचा परिसराचा गैरवापर,शाळा बंद करतांना किंवा इमारत ताब्यात घेतांना पर्यायी व्यवस्था न झाल्याने वंचित मुले,लैंगिक शोषणात नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेली मुले,वैद्यकीय निष्काळजीपणामुळे पिडीत मुले,उपचारात दिरंगाईमुळे शोषित झालेली मुले, निष्क्रियतासंबंधी,कुपोषण, मध्यान्हभोजन,पदार्थ/अंमली पदार्थ गैरवर्तन,बालपणाच्या सर्व विकासाच्या विकृतीविषयीचे पुनर्वसन इत्यादी क्षेत्रातील तक्रारी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून स्विकारण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व पिडीत बालकांनी/पालकांनी किंवा बाल अधिकारठी काम करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तींनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून आयोजित या जनसुनावणीत आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले आहे.