Thursday, March 20, 2025
Google search engine
Homeविदर्भबुलढाणादिवसाधवळ्या सराफा दुकान वर चोरांनी मारला डल्ला ; 8 लाख 70 हजाराचा...

दिवसाधवळ्या सराफा दुकान वर चोरांनी मारला डल्ला ; 8 लाख 70 हजाराचा माल लंपास

चोरटे सी.सी.टीव्ही कैमेरयात कैद चोरीच्या घटनेनेसर्वत्र खळबळ

अमीन शाह चिखली बुलडाणा

शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजा टॉवर परिसरातील सराफा लाईनमधील ‘वेदांत ज्वेलर्स’या दुकानात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करून सुमारे आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास केला आहे. ही घटना २२ जुलैला सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
सराफा बाजारातील वेदांत ज्वेलर्सचे मालक फिर्यादी अशोक बाळाजी डहाळे (वय ५०) हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आपले दुकान उघडण्यासाठी आले. प्रथम दुकानाचे छोटे शटर उघडून त्यांनी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर आपल्याजवळ असलेली पिशवी काऊंटरवर ठेवली व कुलुप, किल्ली आतल्या बाजुने ठेवण्यासाठी गेले असता, या संधीचा फायदा घेत तीन अज्ञात व्यक्ती दुकानात आले. त्यांनी तात्काळ काऊंटरवर ठेवलेली थैली उचलून दुचाकीवरून पोबारा केला. अशोक डहाळे यांनी ओरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे लंपास होण्यात सफल झाले होते. सदरची संपूर्ण घटना ही सीसी कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असल्याचे समजते.
दरम्यान, चिखली पोलीसांनी अशोक डहाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. या पिशवीमध्ये ८० हजार रूपये रोख, अडीचशे ग्रॅम सोने अंदाजे किंमत साडेसात लाख रूपये, १ कीलो चांदी अंदाजे किंमत चाळीस हजार रूपये, असा एकूण ८ लाख ७० हजाराचा माल चोरट्यांनी लंपास केला. शहरामध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असून आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक हुलगे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!