इंडियन बिझनेस क्लब (आयबीसी) च्या वतीने आयोजित इंद्रधनुष बिझनेस मार्गदर्शन शिबीर संपन्न कार्यक्रमात 10 उद्योजक सन्मानित 

572

 पुणे : इंडियन बिझनेस क्लब (आयबीसी) च्या वतीने यशोदा, पुणे येथे आयोजित व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.  या प्रसंगी एसपी जैन स्कूल ऑफ मॅनेजमेंट, मुंबई, ग्लोबल संचालक प्रा. डॉ. परिमल मर्चंट आणि मोटीवेशनल स्पिकर, कॉर्पोरेट ट्रेनर भूपेंद्र सिंह राठोड यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, इंडियन बिझिनेस क्लबचे अनिल मित्तल,  नीतेश मखवाना, दिलीप मॅथ्यूज, अभय खिवंसरा, आणि दीपक बंसल यांनी विशेष परिश्रम घेतले. 
  यावेळी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील 10 उद्योजकांचा सन्मान करणत आला. यामध्ये सहगल ग्रुपचे  रवीन्द्रपाल सिंह सहगल आणि निकी सहगल, सिटी पंडोलचे कावास पुंडोले, एमआरसी लॉजिस्टिकचे राजपाल आर्या आणि अरविंद आर्या, कोहिनूर गु्रपचे कृष्णकुमार गोयल, विहान ग्रुपचे अभय खिंवसरा, वसंत गु्रप आदी फॅमेली व्यावसाय यशस्वी चालविणार्‍या उद्योजकांचा समावेश होता. 
 कार्यक्रमात उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करताना परिमल मर्चंट म्हणाले की, वडील आपल्या मुलाला वारसामध्ये केवळ व्यवसाय आणि व्यापार चालविण्यास देत नाही, तर आपल्या मुलाला अनेक वर्षांचा अनुभव ही प्रदान करतो. हाच अनुभव नव्या पिढीला व्यवसाय आढीसाठी आणि विसतरास फादेशीर ठरतो. व्यवसायाची मार्केटिंग करताना जेवढा वेळा नकाराचा सामना करता तेवढी तुमच्या यशस्वीचा मार्ग मोकळा होत जातो.   व्यवसायाच्या आधुनिक शैलीवर भाष्य करताना ते म्हणाले की, ऑनलाइन कोटेशन देऊन व्यवसाय होत नाही. व्यवसायासाठी फॉलो-अप करणे आवश्यक आहे. त्यासाठी चपला झिजाव्या लागतात.  आजकाल लोक एसी केबिनमध्ये बसून व्यवसाय करू इच्छितात, यामुळे व्यवसाय सोपा झाला आहे, परंतु सौदेबाजी, आपले म्हणणे समाझावणे हे  ई-मेलवर करता येत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष भेट करणे आवश्यक आहे. कुठलाही व्यवसाय असो लाज वाटली नाही पाहिजे. व्यवसाय करण्यासाठी लाज खुंटीला टागली पाहिजे. तसेच या स्पर्धेच्या जगात सदैव सक्रीय राहिले पाहिजे. 
तसेच  भूपेंद्र सिंह राठोड मार्गदर्शन करताना म्हणाले की, यशस्वी होण्यासाठी तुम्ही नियोजनपुर्ण काम  करा, ऑफिसमध्ये बसून राहू नका, तुमचा कर्मचारी तुमच्यावर आवलंबून राहू देवू नका, जणे करून तुमच्या व्यवसायात पारदर्शकता येईल.  त्यांना कामाचे मार्ग सांगा परंतु स्वत:च त्यांना सारखी मदत करू नका.  तसेच आपल्या असफलतेस दुसर्‍या जवाबदार न समजता स्वत्र: जवाबदारी घेवून काय चुकले याचे आत्मपरिक्षण करावे.  सदैव नकारात्मक विचार करू नये, कारण आपण जेसे विचार करतो तशीच कृती होत असते, म्हणून सदैव पॉझिटीव्ह विचार करा.