जनसुनाणीसाठी स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे-डॉ.राजेंद्र भारूड

905

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत 26 जुलै रोजी आयोजित जनसुनावणीत स्वयंसेवी संस्थांनी बालकांच्या समस्या मांडाव्यात तसेच या सुनावणीच्या आयोजनातही सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत ते बोलत होते बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सल्लागार अजिश आय.आर.अभिकाष त्यागी,पूजा जासवानी,सुगंधा जैन,उपमुख्य कार्यकारी अधिकारी बापुराव भवाने,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही.डी.वळवी आदी उपस्थित होते आयोगाला अर्धन्यायिक अधिकार असून त्यामुळे बालकांच्या समस्यांबाबत आयोग संबंधित यंत्रणेला तात्काळ निर्देश देऊ शकते त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन बालकांच्या विविध समस्या स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी आयोगासमोर मांडाव्यात तक्रार अथवा समस्या लेखी स्वरुपात सादर करावी. त्यासाठी सुनावणीच्या वेळी मदत कक्षदेखील असणार आहे,असेही डॉ.भारूड म्हणाले.
स्वयंसेवी संस्थांनी आपल्या सहकार्यांमार्फत जनसुनावणीची माहिती ग्रामीण भागातदेखील पोहोचवावी असे आवाहन पवार यांनी केले जिल्ह्यातील शाळांमधून जनसुनावणीची माहिती देण्यात यावी तसेच तक्रार करताना सविस्तर माहिती व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत तोंडी तक्रार असल्यास मदत कक्षाच्या माध्यमातून तक्रार सादर करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे आयोगाच्या प्रतिनिधींनी सांगितले बैठकीस विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रतिनिधींनी बालहक्काविषयी विविध समस्या यावेळी मांडल्या.
—–
युवकांनी मतदार नोंदणी कार्यक्रमात सहभाग घ्यावा-डॉ.राजेंद्र भारूड

जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात युवकांनी सहभाग घेऊन आगामी निवडणूकीत मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम 15 जुलै पासून सुरू करण्यात आला आहे 30 जुलै पर्यंत हा कार्यक्रम सुरू रहाणार आहे ज्या युवकांना 1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्षे पुर्ण झाली असतील अशा युवकांनी मतदार यादीत आपले नावनोंदवावे. त्यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी तसेच संबंधीत तहसील कार्यालयात उपलब्ध फॉर्म क्रमांक 6 भरून रहिवास व वयाबाबत पुरावा देणे आवश्यक आहे जिल्ह्यातील सर्व वंचित पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन मतदार नोंदणी करावी आणि एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
—-