नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य-जयकुमार रावल

783

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून आपत्तीच्यावेळी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांच्या बचावासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत,असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन,पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले जयकुमार रावल यांनी शहादा तालुक्यातील पावसाने बाधित गावांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे,उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार आदी होते पालकमंत्री म्हणाले, पाऊस जास्त असल्याने नागरिकांनी प्रवाहात वाहतूक करण्याचे धाडस करू नये. जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करीत असून प्रशासनाला सहकार्य करावे. बचावकार्यात महसूल, जिल्हा परिषद आणि पोलीस यंत्रणा एकत्रितपणे कार्य करीत आहे. घरांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पाऊस थांबताच नुकसानिचे पंचनामे त्वरित करून शासनातर्फे आवश्यक मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पुराग्रस्तांची सोय तात्पुरत्या स्वरूपात शाळांमध्ये करण्यात येत असून त्यांना भोजन उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
श्री.रावल यांनी कुढवड-कवठळ येथे पुरामुळे नुकसान झालेल्या आणि सारंगखेडा येथे पावसामुळे पडलेल्या घराची पाहणी केले. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत मदतीचे आश्वासन दिले. शहादा तालुक्यातील रायखेड येथे भिंत पडून मृत पावलेल्या कांताबाई रायसिंग भिल यांच्या मुलाची व मामाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मृत महिलेच्या वारसांना 4 लाख रुपयांचा मदतीचा धनादेश त्यांनी दिला. त्यांनी गावातील नागरिकांना रेनकोट व चादरीचे वाटप केले. पालकमंत्र्यांनी शहादा येथील गोमाई नदीच्या संरक्षक भिंतीची पाहणी केली. अधिकाऱ्यांना पुरपरिस्थितीत सतर्क राहण्याच्या व नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याचा सूचना त्यांनी केल्या नंदुरबार जिल्ह्यातील रायखेड, सारंगखेडा,कुढवड- कवठड ता.शहादा या अतिवृष्टीग्रस्त गावांना पडझड झालेल्या घरांची आणि नुकसानग्रस्त शेतीची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली पाहणी

नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सुचना केल्या. रायखेड येथे भिंत पडून मृत झालेल्या कांताबाई भिल यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले त्यांच्या कुटुंबियांना 4 लाखाचा मदतीचा धनादेश देण्यात आला तसेच अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप ही केले यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड,पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत,प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नंदुरबार तालुका अंतरीम आकडेवारी –
अंशतः पडझड झालेली घरे- 757
पुर्णतः पडझड झालेली घरे- 02
पशुधन हानी- 32
जीवीत हानी – 01
शेतजमीन बाधित- 502.58 हे.आर
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान-
3 पुल बाधित