पूरग्रस्तांसाठी अखिल कोंढवा खुर्द शिवजयंती महोत्सव समितीची मदतीची हाक

881

गणेश जाधव, पुणे

महापुराने वेढलेल्या कोल्हापूर, सांगली ,सातारा या भागात जलप्रलयाने थैमान घातला आहे. हजारो संसार उघड्यावर आले असताना तसेच लाखो लोकांवर हे महासंकट कोसळले असताना अशा आपत्तीत धावून येऊन जाण्याची परंपरा कायम ठेवत अखिल कोंढवा खुर्द शिवजयंती महोत्सव समिती, कोंढवा ग्रामस्थ ने आपद्ग्रस्तांसाठी स्थानिक लोकांच्या तसेच स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे .या समितीच्यावतीने लोकांनी सढळ हाताने मदत करावी असे आव्हान ही करण्यात येत आहे. समाजानेही पुढे येऊन पूरग्रस्तांना मदत करून आपली सामाजिक बांधिलकी अबाधित ठेवली असे मत समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले .मदत आणि पुनर्वसनाचे काम महाप्रचंड आहे यास सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक घटकातील सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांनी मोलाचे योगदान केलेलं पाहिला मिळाले.

या संकटात केवळ शासनाची मदत पुरी पडणारी नाही हे लक्षात घेऊन सामाजिक जाणीव व जबाबदारी याचे भान ठेवून अखिल कोंढवा खुर्द शिवजयंती महोत्सव समिती ,कोंढवा खुर्द ग्रामस्थ यांच्यावतीने पूरग्रस्तांना मदत कार्य शिबिर सुरू केले आहे.. कोल्हापूर, सांगली येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पूरग्रस्तांना मदत शिबिराच्या माध्यमातून लोकांना मदतीची हाक देण्यात आली आहे .मदत शिबिराच्या उपक्रमातून एक जातीय सलोखा पाहायला मिळाला.कोंढवा परिसरातील रहिवाशी ,सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते ,सामाजिक संस्था यांनी वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या साहाय्याने मदत करण्याचे कार्य सुरू केले आहे. सदर च्या कार्याला समाजाच्या प्रत्येक घटकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे .अनेकांनी आपल्या मदत कार्यातून धान्य, बिस्किटांचे पुडे ,गहू ,तांदूळ ,तेल ,नवीन जुने कपडे, साखर ,चादरी ,डाळी,कडधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. आरोग्याच्या दृष्टीने देखील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ,स्थानिक रहिवाशांनी मास्क ,सॅनिटरी नॅपकिन ,डेटॉल साबण ,इत्यादी. गोष्टींची देखील मदत देऊ केली.पूरग्रस्तांची सर्व मदत १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर ,कोंढवा खुर्द पुणे ,येथे हे स्वीकारली जाईल असे समितीच्या विश्वस्तांच्या वतीने कळविण्यात आले आहे. कोंढवा खुर्द ,भागातील अखिल कोंढवा खुर्द शिवजयंती महोत्सव, समितीच्यावतीने मदतीसाठी लोकांना आव्हान केले असून याबाबत आपण खालील व्यक्तींशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे ..सागर लोणकर ९०११५३४५९०,महेश (आबा )लोणकर९३७१०४४३३४,अतुल जावळकर९९२२२२९९३१….