मदत स्विकारताना लाभार्थीनां अश्रु अनावर

1190

पुणे प्रतिनिधी,

वडगावशेरी भागातील आनंदपार्क सोसायटी,आनंद कॉर्नर आणि ज्ञानदा फाऊंडेशन,पुणे यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातीलमाळभाग, कोर्टभाग, आष्टा, शिरगाव, दुधगाव, मालेवाडी येथिल कुटुबांना घरोघरी जाऊन गहु,ज्वारी,तांदुळ,साखर,तेल,बिस्किट पुडे,चहापावडर, बिसलरी बॉटल, कोलगेट, मसाले,इत्यादी वस्तुचे किट देण्यात आले.तसेच कपडे,चादर,बेडशिट,चटई, सॅनिटरी नॅपकिन इत्यादी वस्तु मदत स्वरुपात देण्यात आले. हे किट स्विकारताना ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रु आले.पुर परिस्थिती नंतर आमच्या पर्यत हिच एकमेव मदत योग्य प्रकारे व सर्वाना समप्रमाणात मिळाली अशा ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या. आनंद पार्क सोसायटीतील मदत संकलन केंद्रात 6 टन वस्तु मदत स्वरुपात जमा झाले.‌यात 150 पेक्षा जास्त दानशुर व्यक्तीनी मदत केली. तसेच लाभार्थी किट बनवण्यासाठी सोसायटीतील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या उपक्रमात सुनिल चुत्तर, गोकुळदास बैरागी, जितेंद्र ठोंबरे, प्रदिप साकोरे,मंदार कुलकर्णी,ओंकार पोखरकर, प्रणव साकोरे,पोपट कौठाळे,कुलेश झा, दुर्गानंद झा यांचे देखिल योगदान होते.

सांगली येथे सेवा करण्यासाठी सरसावले आनंदपार्क मधील तरुण पिढी…
लाभार्थी किट चे वाटप योग्य लाभार्थी कुटुबां पर्यत पोहचावे या करिता आनंदपार्क मधील तरुण कार्यकर्ते राहुल पोखरकर, पुष्कराज देशपांडे, प्रमोद वडते, स्वप्निल बैरागी, सुजित गायकवाड, विवेक ओव्हाळ, अमोल पाटील, राजेश सोलंकी, निवृत्ती सुक्रे, शंशिकात तेलधुने,बबलु मिश्रा,राठोड हे या सेवाकार्यात सहभागी होते.