शिंदखेडा तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत

861

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

शिंदखेडा तालुक्यालाही अतिवृष्टीचा फटका बसला असून तापिकाठावरील नागरिकांनाही जास्त फटका बसला आहे तापी नदीला आलेला पूर हातनूर धरणामधून झालेला पाण्याचा विसर्ग याचा चांगलाच फटका तापिकाठावरील गावांना अडचणीत आणणारा ठरला आहे सध्या सांगली व कोल्हापूर कडे मदतीचा ओघ लागला असतांना शिंदखेडा तालुक्यातील आच्छी हिसपूर गावातील नागरिकांनाही पुराचा सामना करावा लागला या गावातील पुरांचा सामना करणाऱ्यांना जळगाव येथील एनजीओ संस्थेने मदतीचा हात पुढे करत नागरिकांना कपडे खाद्य तेल साखर डाळी व संसारोपयोगी वस्तूंचे वाटप केले
याप्रसंगी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पीएसआय एम सैय्ययद आच्छी गावचे सरपंच मनोज ईशी हिसपूरचे सरपंच भिकन पाटील दोघंही गावचे उपसरपंच हिसपूरचे पोलीस पाटील एनजीओ संस्थेचे कार्यकर्ते गावातील नागरिक उपस्थित होते अशी माहिती रंजाण्याचे पत्रकार रवि शिरसाठ यांनी कळवली आहे युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी,वसीम खान,सुमेध सोनवणे,सुमीत कोल्हे,फहिम खान,राकेश वाणी,इफतेकार खान,जकी अहमद,योगेश चौधरी,नईम खान,चंदन मोरे, फहिम खान,शंतनू सोनवणे, रिझवान शेख,माया शेख, निखिल सोनार,फिरोज शेख, दानियल अलाउद्दीन,प्रमोद प्रजापत,तबरेज सैय्यद,वाहिद खान,इमरान सैय्यद,तौसिफ खान,इफतेकार खान,फिरोज खान,इसराईल गवळी,मयुर विसावे,शोएब शेख,असरार खान,अश्रफ खान,शुभम शिंदे आदी हिंदू-मुस्लीम बांधवांचे सहकार्य लाभले.