कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल व रोख रक्कम हिसकावणाऱ्यास अटक

711

गणेश जाधव,पुणे

२७ऑगस्ट २०१९, रोजी पहाटेच्या सुमारास धीरज कुमार श्रीकांत बिहानी रा.वाघोली हे त्यांच्या दुचाकीवरून संगमवाडी करिता निघाले असता त्यांना रस्त्यात तीन अज्ञात इसमांनी अडविले व त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी धीरजकुमार बिहानी यांच्याकडून मनगटी घड्याळ ,मोबाईल फोन ,रोख रक्कम तसेच दुचाकीची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतली व तेथून ते पसार झाले.

घडलेल्या गुन्ह्याची माहिती मिळताच रात्री गस्त घालणारे येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व पोलीस शिपाई निकम व भाकरे यांना गस्ती दरम्यान काही अज्ञात इसमांवर संशय आल्याने त्यांनी संशयित आरोपी राकेश जॉन सकट ,वय 19 रा .मंगळवार पेठ,  हरजिंदर सिकंदर सिंग बग्गा ,वय 23 वर्षे रा. लोहगाव व त्याच्या सोबत अल्पवयीन साथीदार यांना देखील ताब्यात घेतले .सदर आरोपीवर संशय बळावल्याने त्यांची कसून चौकशी केली असता तसेच पोलिसी खाक्याचा दम भरला असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली..

कबुली दरम्यान त्यांनी गुन्ह्यात जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आलेला मोबाईल फोन ,रोख रक्कम ,मनगटी घड्याळ व गाडीची चावी त्यांच्याकडून हस्तगत केली गेली..

सदरच्या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस आयुक्त( पूर्व विभाग )सुनील फुलारी मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 चे प्रसाद अक्कानवरु ,मा.सहा पोलीस आयुक्त (येरवडा) रामचंद्र देसाई ,मा .वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख तसेच मा. पोलीस निरीक्षक( गुन्हे) अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व पोलीस निरीक्षक शेख ,मेमाने हे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत..