सातव्या आर्थिक गणनेचा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी घेतला आढावा

624

पुणे प्रतिनिधी,

केंद्र शासनाच्या सांख्यिकी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक गणना 2019 मध्ये घेण्यात येत आहे. आर्थिक गणनेव्दारे कार्यरत सर्व प्रकारच्या आर्थिक कार्यात गुंतलेल्या आस्थापनांची माहिती या माध्यमातून संकलित केली जाणार आहे. या गणनेव्दारे उपलब्ध होणारी माहिती राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज अधिक अचुकपणे तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यासोबतच राज्य, जिल्हा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावरदेखील प्रशासकीय व्यवस्थापन व नियोजनासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे. पुणे जिल्हयातील सातव्या आर्थिक गणनेच्या कामकाजाचा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी आज आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रिती तेलखडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हयात सातव्या आर्थिक गणनेची अंमलबजावणी करण्यासाठी केलेली तयारी, उदभणा-या अडचणींचे निराकरण करून नियमित सनिंयत्रण कसे करता येईल, जिल्हास्तरावरील भूमिका व कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी राज्यस्तरीय सनम्वय समितीला सहाय्य, सातवी आर्थिक गणना सुरळीत पार पाडण्यासाठी सेवा केंद्रांना यांना मदत करणे आदी विषयावर चर्चा झाली.
0000