जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचे आंदोलन

838

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जुन्या पेन्शनसाठी काळया फिती लावून डि सी पि एस पेन्शन योजनेचा निषेध व्यक्त केला.अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथिल सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जुन्या पेन्शनसाठी काळया फिती लावून डि सी पि एस पेन्शन योजनेचा निषेध व्यक्त केला.
शासनाने दि 1 नोव्हेबर 2005 पासून नोकरीत रूजू झालेल्या कर्मचा-यांचे कुटूंब निवृत्ती वेतन बंद केले आहे या जुन्या पेन्शन योजनेऐवजी अन्यायकारक नवीन अंशदायी पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. माञ ही कर्मचा-यांसाठीअन्यायकारक आहे यात काही तथ्य नाही या योजनेचा अद्याप हिशेबही देण्यात आला नाही जुनी पेन्शन योजना बंद करण्याच्या निर्णयामुळे लाखो कर्मचा-यांचे भवितव्य अंधारात करणा-या निर्णयाचा निषेध म्हणून आज काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला वाण्याविहीर येथिल सातपूडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी काळी फित लावून कामकाज केले यावेळी प्रदिप वसावा,रविंद्र मराठे,विनोद पाटील,योगेश्वर बुवा,पंकज मराठे,विठ्ठल शिंदे,प्रमोद माळी,हंसाबेन पाडवी,चेतन पाटील,जयेश मराठे, राहुल चव्हाण,सुशिल मगरे,किसन पाडवी,चारूशिला पाटील, जयेश सुर्यवंशी,कन्हैया साळूंके,प्रशांत कुवर,सोनाली चौधरी,निलेश बोराणे,प्रकाश तडवी,तुषार नाईक,बैसिंग पावरा,प्रा.संदिप भावसार,प्रा. दिनेश पवार,प्रा.प्रविण महाले, यांनी यावेळी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे जिल्हाभरात काळी फित लावून कामकाज करण्यात आले.
शासनाने नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना त्यांच्या हक्काची जूनी पेन्शन योजना पूर्वरत सुरू करावी नविन अन्यायकारक असलेली नविन डी सी पी एस पेन्शन योजना त्वरीत बंद करावी या डी सी पि एस योजनेबद्दल शिक्षक वर्गात मोठा रोष असून या नविन डी सी पी एस पेन्शन योजनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज शिक्षक दिनी शाळा व महाविद्यालयात काळ्या फिती लावून जाहिर निषेध व्यक्त केला आहे. तरी शासनाने कर्मचा-यांच्या आक्रोशाचा अंत न पाहता जुनी पेन्शन योजना लागू करावी या जुन्या पेन्शनसाठी लढणा-या शिक्षकांना आमच्या व्ही जे एन टी टिचर फेडरेशन या संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. असे योगेश्वर बुवा
विभागीय उपाध्यक्ष व्ही.जे.एन.टी.टिचर फेडरेशन नाशिक विभाग, यांनी कळविले आहे.