गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात रस्ते विकासाला गती

772

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गेल्या पाच वर्षात 954 किलोमीटरच्या विविध मार्गांची कामे करण्यात आली असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून देखील रस्ते विकासाला गती देण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 191 किलोमीटर लांबीच्या राज्य मार्गाची कामे करण्यात आली त्यासाठी 91 कोटी 64 लक्ष रुपये खर्च करण्यात आला तर 320 किलोमीटरच्या जिल्हा मार्गासाठी 57 कोटी खर्च करण्यात आला नाबार्ड अंतर्गत 35 किलोमीटर आणि केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत 56 किलोमीटर रस्त्यांची कामेदेखील करण्यात आली यात रस्तेबांधणी आणि सुधारणा अशा दोन्ही कामांचा समावेश आहे हायब्रिड
अन्युटी अंतर्गत 145 किलो
मीटरची कामे मंजूर करण्यात आली आहेत त्यावर 627 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे विशेष दुरुस्ती अंतर्गत 32 किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात आली. रस्त्यांची बांधणी व सुधारणेवर गेल्या पाच वर्षात एकूण 399 कोटी खर्च करण्यात आला. नंदुरबार-सज्जीपूर तळोदा रस्त्यावर हातोडा गावाजवळ तापी नदीवर मोठ्या पुलाचे काम करण्यात आल्यानेअक्कलकुवा,
तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातून नंदुरबार येथे पोहोचण्याचे अंतर 20 किलो
मीटरने कमी झाले आहे.
दुर्गम भागाच्या विकासासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महत्वाच्या ठरल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण रस्त्याच्या विकासाला महत्व दिले आहे जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने
अंतर्गत गेल्या पाच वर्षात 28 पूल आणि 358 किमी लांबीचे एकूण 52 रस्त्यांची कामे करण्यात आली या कामांवर 228 कोटी रुपये खर्च करण्यात आला तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 310 किमी लांबीच्या 42 रस्त्यांची कामे पुर्ण करण्यात आली त्यासाठी 165 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे दळवणवळण सुविधांच्या विकासामुळे जिल्ह्याच्या एकूण विकासावरही सकारात्मक परिणाम होत आहेत नुकत्याच झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक रस्त्यांची हानी झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने बहुतेक ठिकाणी युद्धपातळीवर कामे करून वाहतूक सुरळीत केली आहे. एकूणच रस्त्यांच्या या कामामुळे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळत आहे