सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या वतीने मदत

1324

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या धडगाव अक्कलकुवा बाधित झालेल्या पूरग्रस्त आदिवासी बांधवांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती सरकारी पद्धतीने अत्यंत थोड्या लोकांना थातूरमातूर पंचनामे करून फक्त तांदूळ देण्यात आला होता,आदिवासी बांधवांची ही व्यथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनानेते खासदार संजय राऊत यांनी नंदुरबार व धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या विनंतीनुसार सांगितली,उद्धव ठाकरे यांनी तातडीने जीवनावश्यक वस्तू नंदुरबारला पाठविण्याचे आदेश दिलेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप दिनांक8व9सप्टेंबर रोजी नंदुरबार व धुळे जिल्हा संपर्क
प्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत निगदी व तोरणमाळ येथें करण्यात आले नंदुरबार जिल्हाप्रमुख आमशा पाडवी व उपजिल्हाप्रमुख गणेश पराडके यांनी अतिवृष्टीमुळे अक्कलकुवा
धडगांव या दोन्ही तालुक्यातील आदिवासी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे गेल्या चार वर्षांत संपर्कप्रमुख थोरात हे वेळोवेळी सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या हितासाठी काही ना काही उपक्रम राबवित आले आहेत,दऱ्या खोऱ्यातून अनवाणी पायाने शाळेत जाणाऱ्या विदयार्थ्यांना चप्पल व बूट वाटप असो अथवा हातात बियाण्याच्या थैलीत वह्या पुस्तके नेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे वाटप असो, फाटक्या कपड्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश असोत,थोरात यांनी शिवसेनेच्या माध्यमातून वेळोवेळी काही ना काही देत आले आहेत अतिवृष्टीने बेजार झालेला आपला आदिवासी बांधव विवंचनेत बघून शिवसेना स्वस्थ कशी बसेल उपजिल्हा
प्रमुख गणेश पराडके यांनी त्वरित वाळीत पडलेल्या सातपुड्याची शोकांतिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि संपर्कप्रमुख थोरात यांना कळविली शासनाच्या मदतीची वाट न पाहता पक्षप्रमुखांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी दोन ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू पाठविल्या. रविवारी 8 सप्टेंबर रोजी धडगांव तालुक्यातील निगदी या गांवी निगदी,रूणमालपाडा,काकडदा, घाटली,धावलघाट,खामला, मोडलगांव,गोरंबा,वलवाल, जुगणी व आसपासच्या गांवातील जवळपास एकूण 1800 कुटुंबियांना तांदूळ,डाळ, गहू,पीठ,मीठ,तेल,बिस्किटे, महिलांना साड्या व सॅनिटरी नॅपकिन्स,वृद्ध पुरुषांना ब्लॅंकेट्स व चादरी,लहान मुलांना चिवडा, बिस्किटे व खाऊ तसेच शालेय विद्यार्थ्यांना दप्तरे,वह्या व कंपासपेटी वाटण्यात आल्या. मिनाक्षीताई गणेश पराडके यांच्या हस्ते महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. अतिवृष्टीने त्रासलेल्या गावकऱ्यांना संकटकालीन शिवसेनेची ही जीवनावश्यक वस्तूंची मदत ही आधार देणारी ठरली कारण सातपुड्याच्या डोंगरदऱ्यात उतारावर नदीच्या खोऱ्यात शेती असल्याने अतिवृष्टीने आधीच होत्याचं नव्हतं झालेलं असतांना ह्या वस्तू हातात पडतांना आज निगदी गांवात आनंदाश्रूंची अतिवृष्टी बघायला मिळाली मी जरी मुंबईत असलो तरी सातपुड्यात आपली संस्कृती जपणारा आहे त्या परिस्थितीत अल्पसमाधानाने जीवन व्यतीत करणारा आदिवासी बांधव नेहमीच माझ्या हृदयस्थानी आहे एखादा समाज ज्यावेळी कात टाकण्याची इच्छा बाळगून असतो त्यासाठी त्या समाजाच्या तरुणांचा विकास होणं गरजेचे असते शिवसेना नेहमीच तरुणांच्या पाठीशी आहे असे सांगून थोरातांनी निगदीतील युवकांना प्रेरणा दिली रात्री 9:00 वाजता लगेचच संपर्कप्रमुख थोरात,जिल्हाप्रमुख आमशा पाडवी,उपजिल्हाप्रमुख गणेश पराडके व कार्यकर्त्यांचा ताफयासह तोरणमाळच्या दिशेने निघाला रस्त्यात एका चढावावर धान्य व इतर साहित्याने भरलेले वाहन चढत नव्हते त्यावेळी रात्री पायी डोंगर चढून पिंट्या वळवी व रणजित चव्हाण यांनी डोंगरावर असलेल्या गावात अंधाऱ्या रात्री शेतातून चालत विंचू,काटा,साप व वन्य पशूंची किंचीतही भीती न बाळगता घरोघरी चौकशी करून दुसरे वाहन शोधून आणले सिंदा पटले,रणजित चव्हाण,रिजवान शेख,बंटी सोनवणे या शाखा
प्रमुखांनी अर्धा अधिक सामान दुसऱ्या गाडीत स्वतःभरले. विधानसभा संघटक विजय ब्राम्हणे व तालुकाप्रमुख महेश पाडवी यांच्या कौशल्यपूर्ण नियोजनाची,तसेच पक्षाप्रती असलेली शिवसैनिकांच्या निष्ठेची एक झलक यांतून दिसून आली रात्री सुमारे 12:30 वाजेच्या सुमारास दोन्ही वाहने व्यवस्थितरित्या पोहोचली यावेळी थोरात यांनी कौतुकाने शिवसैनिकांची पाठ थोपटली.
सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी तोरणमाळ येथील उपसरपंच करमसिंग चौधरी,उपतालुका
प्रमुख जीवन रावताळे व संदीप पावरा यांच्या नियोजनात जुने तोरणमाळ,नवे तोरणमाळ, खडकी,सिंधिदिगर या गावातील जवळपास 800 बाधितांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप संपर्कप्रमुख बबनराव थोरात आमश्या पाडवी,गणेश पराडके, अक्कलकुवा उपतालुकाप्रमुख तुकाराम वळवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर असलेलं समाधान खूप काही बोलून गेले तोरणमाळ ग्रामस्थ व शिवसेना याच्यात असलेल्या घट्ट नात्याची प्रचिती येथे दिसून आली पूर
ग्रस्तांना साहित्य मदत वितरणासाठी शिवसेना अक्कलकुवा विधानसभा संघटक विजय ब्राम्हणे, तालुकाप्रमुख महेश पाडवी, उपतालुकाप्रमुख प्रताप पटले, पाडवी,शहरप्रमुख मिनेश चव्हाण तालुका युवा अधिकारी मुकेश वळवी,पिंटू वळवी, कांतीलाल वळवी,नारायण पावरा,भाईदास वळवी भिका पाडवी,मानसिंग पावरा,रणजित चव्हाण,महेंद्र मेटकर,रिजवान शेख,चंदू पटले,राया पटले, मानसिंग वळवी,वनसिंग तडवी, जयसिंग पावरा,जोब्या पावरा, मांगा पावरा,सिंधा पटले,दिलीप रावताळे,कु ज्योती बोलसे,सौ अर्चना राऊत व शिवसैनिक बंटी सोनवणे आदि शिवसैनिकांनी परिश्रम घेतलेत