इमानदारी अजुन जिवंत आहे

1177

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा गावातील रहिवासी सौ.रंजना प्रकाश पाटील या कामानिमित्त लोणखेडा ता.नंदुरबार येथे गेल्या असता त्यांच्या गळ्यातील पोत(अंदाजे किंमत रु 50000)हरविली होती,
ती पोत रमेश दत्तू पाटील यांचे चिरंजीव अरुणभाई यांना सापडली,मात्र कुणाची पोत आहे हे त्यांना माहित नव्हते, म्हणून त्यांनी गावात कळविले की कुणाची पोत हरविली आहे असे लक्षात आले व ओळख करून दिली तर सोन्याची पोत सदर मालकाला परत करायची आहे,चार दिवसानंतर निरोप लागल्यावर गेलो असता त्यांनी विना काही मोबदला घेता सर्व कुटुंबाने आनंदाने सोन्याची पोत परत केली रमेश भाई यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आभार मानावे तेवढे कमी आहेत,सापडलेली सोन्याची वस्तू मालक शोधून परत करणे ही फार मोठी गोष्ट आहे माणसाने किती इमानदारीने जीवन जगावे हे शिकवून जाणारी घटना आहे.