अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवबंधनात

999

ज्ञानेश्वर पोले , हिंगोली

अखिल भारतीय मराठा महासंघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष मा.त्र्यंबकराव लोंढे यांनी आज सोमवारी मुंबईतील शिवसेना भवन येथे शिवसेनेचे सचिव तथा मा.खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्र सध्या पक्षांतरन करणाऱ्या ची रिघ लागली आहे.यात आता सामाजिक संघटनेतून राजकीय क्षेत्रात प्रवेशाची संख्या ही दिवसें न दिवस वाढत आहे.मा.लोंढे हे गेल्या कित्येक वर्षापासून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या हिंगोली जिल्हा अध्यक्ष पदावर कार्यरत होते.संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजातील जनसामान्याचे अनेक प्रश्न सोङविण्याचे प्रयत्न केले.मा. त्र्यंबकराव लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबई येथील शिवसेना भवनात शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी हिंगोली लोकसभा संपर्कप्रमुख मा.आनंदराव जाधव, मा.खासदार हेमंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. संतोष बांगर, जिल्हासहसंपर्कप्रमुख मा. राजेंद्र शिखरे उपजिल्हाप्रमुख मा.परमेश्वर मांडगे, डी. के. दुर्गे, राम कदम, कळमनुरी पंचायत समितीचे उपसभापती मा. गोपू पाटील, मयूर शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.मा.लोढे यांच्या शिवसेना प्रवेशाने हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे ताकद आणखीन वाढेल.