माेरया’ गाण्याच्या अभूतपूर्व यशासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी टीम ‘भुतियापंती‘ !

517

पुणे प्रतिनिधी

गणेशोत्सव नुकताच संपन्न झाला व याही गणेशोत्सवात अनेक नवीन ‘गणपती’ गाणी मार्केटमध्ये आले .परंतु आनंद शिंदे यांच्या आगामी ‘भुतियापंती‘ चित्रपटातील ‘माेरया’ गाण्याने रसिकांना सर्वाधिक मोहिनी घातली. गणेश चतुर्थीच्या आसपास प्रदर्शित झालेल्या आनंद शिंदे यांच्या मराठी चित्रपटातील पहिल्याच ‘गणपती’ गाण्याने या गणेशोत्सवात धुमाकूळ घातला. या गाण्याला अल्पावधीतच मिळालेल्या व मिळणाऱ्या अभूतपूर्व यशामुळे सद्गतीत झालेली ‘भुतियापंती’ ची टीम मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचली. त्यांनी त्यांच्या चित्रपटातील ‘माेरया’ गाण्याला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाबद्दल ‘बाप्पा’ चे मनःपूर्वक आभार मानले.

त्यांची गणपतीबाप्पाजवळ व्यक्त केलेली कृतज्ञता भावुक करणारी होती. या गाण्यासारखेच यश ‘भुतियापंती’ सिनेमाला मिळू दे असे साकडे त्यांनी सिद्धिविनायकाला घातले. यावेळी निर्माते विनोद बरदाडे व  नरेश चव्हाण व सहनिर्माते  यशवंत डाळ आणि दिग्दर्शक संचित यादव उपस्थित होते तर सिद्धिविनायक ट्रस्ट चे माजी अध्यक्ष धनंजय बरदाडे आणि कलाकारांच्या वतीने कमलेश सावंत यांनी हजेरी लावली होती. इतर कलाकारांची नावे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

लवकरच ‘भुतियापंती’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे